आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • 4 Killed, 6 Ejected In Auto Truck Accident At Beed

बीडजवळ अॅपे आणि ट्रकचा भीषण अपघात, चार जण ठार, नऊ गंभीर

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अपघातील जखमी - Divya Marathi
अपघातील जखमी
बीड - येथून जाणाऱ्या औरंगाबाद-सोलापूर महामार्गावर आज (बुधवार) सकाळी एका अॅपेला भरधाव वेगाने येणाऱ्या ट्रकने धडक दिली. या भीषण अपघातात अॅपेतील चार जण जागीच ठार झाले असून, नऊ जण गंभीर जखमीत. त्‍यांच्‍यावर बीडच्‍या जिल्‍हा सामान्‍य रुग्‍णालयात उपचार सुरू आहेत. ही दुर्घटना शहरातील खजाना विहीर परिसरातील असारडोह फाटा येथे घडली. अपघातग्रस्‍त कपीलधार येथे संत मन्मथ स्वामींच्या यात्रेला जात होते.

सर्व मृतक नांदेड जिल्‍ह्यातील
या अपघातात शंकर मठपती, अस्मत अक्का बाबू मठपती, माधाबाई बालाजी झुंबाळ, काशाबाई राचप्पा असुरे ऊर्फ गुडमे सुलोचना यांचा मृत्‍यू झाला असून, ते सर्व नांदेड जिल्‍ह्यातील बोरी (ता.कंधार) येथील रहिवाशी आहेत. या प्रकरणी बीड ग्रामीण पोलिस ठाण्‍यात ट्रक चालकाविरुद्ध गुन्‍हा दाखल करण्‍यात आला.
वाहतूक झाली विस्‍कळीत
या अपघातामुळे औरंगाबाद - सोलापूर या महामार्गावरील वाहतूक काही काळ विस्‍कळीत झाली होती. दरम्‍यान, ग्रामीण पोलिसांनी घटनास्‍थळी येत अपघातग्रस्‍त वाहनांना क्रेनच्‍या मदतीने रस्‍त्‍याच्‍या बाजूला केले. त्‍या नंतर वाहतूक सुरळीत झाली.
पुढील स्‍लाइड्सवरवाचा, का झाला अपघात ?