आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

योजना हस्तांतर मुद्द्यावरून 4 गावे तहानलेली, तेरणा धरण तुडुंब भरुनही फायदा नाही

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
उस्मानाबाद - तेरणा धरण तुडुंब भरलेले असतानाही तेर, येडशी, ढोकी व कसबे तडवळा गावे अद्यापही तहानलेलीच आहेत. सुमारे १६ कोटी रुपयांची महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाची योजना हस्तांतरणाच्या लाथाळ्यांमुळे रखडली आहे. तातडीने ही योजना कार्यान्वित नाही केली तर रस्त्यावर उतरून आंदोलन करण्यात येईल, असा इशारा जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्षा अर्चना पाटील यांनी दिला आहे.   
 
जिल्हा परिषदेच्या मुख्यालयात योजना कार्यान्वित करण्यासाठी एमजीपी व जिल्हा परिषद पाणीपुरवठा विभागातील अधिकाऱ्यांची उपाध्यक्षा पाटील यांनी बैठक घेतली. मात्र, या बैठकीत योजना कोण ताब्यात घेऊन कार्यान्वित करायची याबाबत दोन्ही विभागांनी एकमेकांकडे बोट दाखवले. यातून काहीच मार्ग निघत नाही. यामुळे उपाध्यक्षा पाटील यांनी आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे. यासंदर्भात त्यांनी पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली.  

 
यावेळी उपाध्यक्षा पाटील म्हणाल्या की,  या चार गावांची लोकसंख्या ६० हजार आहे. मात्र, येथील नागरिकांना आता कूपनलिकांवर अलंबून राहावे लागत आहे. येथील पाणी पिण्यायोग्य नसल्याचा अहवाल असतानाही पर्याय नसल्यामुळे पाणी पिण्यासाठी वापरावे लागत आहे. जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत अडीच कोटी मंजूर असतानाही लेखाशीर्ष उपलब्ध नसल्यामुळे हा निधी पडून आहे. योजनेचे एक कोटी ३० लाख वीज बिल थकीत आहे. बिल भरल्याशिवाय वीज सुरू होऊ शकणार नाही.
 
आता यासाठी शासनाने निधी उपलब्ध करावा, अशी मागणी उपाध्यक्षा पाटील यांनी केली. अन्यथा सोमवारी (दि. २४)  एमजीपीच्या कार्यालयात कुलूप ठोकणे, दि. २७ एप्रिलला ढोकी येथील पेट्रोल पंप चौक व येडशी येथील चौकात ग्रामस्थ रास्ता रोको आंदोलन करणार आहेत. इतक्यावरही पाणीपुरवठा सुरू न केल्यास तेरणा धरणावरील सर्वच पाणीपुरवठा योजना बंद करण्याबाबत विचार करण्यात येईल, असाही इशारा उपाध्यक्षा पाटील यांनी दिला आहे.    
 
यासंदर्भात आंदोलनाचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहे. यावर उपाध्यक्ष पाटील, जिल्हा परिषद सदस्या सारिका वाघ, मीना माळी, पंचायत समिती सदस्य बाजीराव पवार, संग्राम समुद्रे, संजय लोखंडे, तेरच्या सरपंच सुवर्णा माळी,  ढोकीचे उपसरपंच अमर समुद्रे, भास्कर माळी, शहाजी वाघ, झुंबर बोडके, शिवाजी देशमुख, विजय माळी, मुरलीधर पुजारी, महादेव गाढवे आदींच्या सह्या आहेत.
 
दुरुस्तीत अपहार?   
चार गावांच्या या योजनेसाठी १९९९ ला १६ कोटी मंजूर झाले होते. यातून २००६ मध्ये योजना कार्यान्वित करण्यात आली.  नंतर २०१३ ला योजना पाण्याअभावी बंद होती. या दरम्यानच्या काळात ५२ लाखांची पाणीपट्टी वसूल करण्यात आली. यातील बहुतांश रक्कम योजनेची गळतीच्या दुरुस्तीसाठी वापरण्यात आले. मात्र, यामध्ये मोठा अपहार झाल्याचा आरोप उपस्थित ग्रामस्थांनी केला. यामुळे एमजीपीचे प्रभारी कार्यकारी अभियंता आर. बी. सूर्यवंशी  चांगलेच हादरले. त्यांनी तेथेच आरोप फेटाळून लावले
 
बातम्या आणखी आहेत...