आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • 43 Lac Secand Fej Grant For Manjara River Development

मांजरा खोलीकरणाच्या दुसऱ्या टप्प्याच्या प्रारंभी ४३ लाख निधी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लातूर- लातूर तालुक्यातील मांजरा नदीचे लोकसहभागातून खोलीकरण रुंदीकरण करण्यात येत आहे. या कामाच्या दुसऱ्या टप्प्याला रविवारी सुरुवात झाली. या वेळी लोकसहभागातून ४३ लाख देण्याची घोषणा करण्यात आली असून यापैकी काहींनी धनादेशही जमा केले आहेत.
दुसऱ्या टप्प्याचा शुभारंभ जलयुक्त चळवळीचे मार्गदर्शक डॉ. अशोकराव कुकडे यांच्या हस्ते झाला. या वेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिनकर जगदाळे, ॲड. मोहनराव गोमारे, ॲड. त्र्यंबकदास झंवर, बी.बी. ठोंबरे, आर्ट ऑफ लिव्हिंगचे मकरंद जाधव, नागझरीचे सरपंच श्रीराम सोळंके उपस्थित होते. या वेळी डॉ. कुकडे म्हणाले, जलयुक्त चळवळीसाठी दिवसागणिक प्रतिसाद वाढत आहे. त्यामुळे ठरलेल्या वेळेत हे काम पूर्ण होणार आहे. पाणीटंचाईला तोंड देताना लातूरकरांनी धैर्य आणि सामंजस्याचा परिचय दिल्याचे स्पष्ट करत जगदाळे म्हणाले, समस्या सोडवणे ही फक्त शासनाचीच जबाबदारी नसून आपणही योगदान देऊन लातूरकरांनी पुढाकार घेताल. त्यामुळे जलयुक्त शिवारांची संकल्पना यशस्वी करण्याच्या हेतूने चळवळीचे देशभरात कौतुक होत आहे.
येत्या मेअखेरपर्यंत कामे पूर्ण करण्याचा संकल्प : लोकसहभागातून मांजरा नदीचे १८ किमी लांब, ८० मीटर रुंद आणि आहे त्यापेक्षा तीन मीटर खोलीकरण करण्यात येत आहे. अद्याप जवळपास तीन किमीचे काम पूर्ण झाले आहे. उर्वरित काम येत्या मेअखेरपर्यंत पूर्ण करण्याचा संकल्प करण्यात आला आहे.
मांजराच्या खोलीकरणासाठी लातुरातील सीए असोसिएशन- ११ लाख हजार १११, बिल्डर्स असो.- ११ लाख , कॅनरा बँक- ११ लाख, प्रोफेशनल टीचर्स असो.- १२ लाख २६ हजार २२२, पुणे येथील प्रीती फाउंडेशन- लाख ५१ हजार, प्लायवूड असो.- लाख ११ हजार, साई विहार हाउसिंग सोसायटी- ८१ हजार यासह लातुरातील विविध स्वयंसेवी, सामाजिक संस्था आणि संघटनांनी निधी देण्याचे जाहीर केले. जाहीर करण्यात आलेल्यांपैकी काहींनी धनादेश रोख रक्कम सार्वजनिक जलयुक्त लातूर व्यवस्थापन समितीकडे सुपूर्द केली आहे, तर काही जण लवकरच देणार आहेत.