आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तलाव फुटण्याचा धोका, लगतच्या ४५ शेतकऱ्यांना नोटिसा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
खामगाव- येथील तलावाच्या बाजूला एका शेतकऱ्याने जेसीबीद्वारे भराव टाकून सांडव्याचे पाणी दाबले गेल्याने तलाव फुटण्याची भीती निर्माण झाली असून परिसरातील जवळपास ४५ शेतकऱ्यांना सुरक्षेच्या दृष्टिकोनातून तहसीलदारांनी नोटिसा दिल्या आहेत. तहसीलदार किशोर देशमुख यांनी तलावाची पाहणी करून तलावाच्या भिंतीखालील शेतकऱ्यांना अापद््ग्रस्त ठिकाणाहून हलवण्याचे निर्देश नोटिसीद्वारा देण्यात आले आहेत. १९७५ मध्ये या तलावाचे बांधकाम पूर्ण झाले असून आतापर्यंत केवळ एकदाच हा तलाव पूर्ण क्षमतेने भरला होता. धरण भरल्यानंतर ओव्हरफ्लोचे पाणी सांडव्याद्वारे नदीत सोडले जायचे, परंतु स्थानिक शेतकऱ्यांनी सांडव्याकडील भागाचा जेसीबीद्वारे भराव टाकून शेताची लेव्हल करण्याचा प्रयत्न केला गेला. परिणामी तलावाच्या सांडव्याच्या बांधापेक्षा अधिक भराव टाकण्यात आल्याने सांडव्याचे पाणी जाण्यास अडथळा निर्माण झाला आहे. सध्या केवळ दोन फूट पाणी बांधावर चढण्याचे बाकी असून तातडीने पाटबंधारे विभागाने लक्ष घालणे गरजेचे आहे.

नाल्यांनाही पूर; शेतीचे होतेय नुकसान
ऐनतलावाच्या सांडव्याच्या बाजूला भराव टाकण्यात आल्यामुळे मागे नाल्यांनाही पूर येत आहे. या पुराचे पाणी नाल्यांभोवताली शेतात शिरत आहे. त्यामुळे काही शेतकऱ्यांच्या शेतजमिनी या नाल्यांच्या पुरात खरडून गेल्या आहेत. काही शेतकऱ्यांचे शेतात असलेले ठिबकचे पाइपही वाहून गेले असून यामुळे तलावाला जोडणाऱ्या नाल्यांच्या पुरामुळे शेतकरी हैराण झाले आहेत.