आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अशोक चव्हाणांना होमग्राऊंडवरच धक्का, काँग्रेसचे पाच नगरसेवक भाजपच्या वाटेवर

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नांदेड- पालिका निवडणूक काही दिवसांवर येवून ठेपलेली असताना कॉग्रेस, शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी राजीनामा देऊन भाजपची वाट धरली आहे. यामुळे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांना स्वत:च्या बालेकिल्ल्यातच मोठा धक्का बसल्याचे मानले जात आहे.

कॉंग्रेसचे 5, शिवसेनेचे 4 आणि राष्ट्रवादीच्या 2 नगरसेवकांनी सोमवारी पालिका आयुक्तांकडे राजीनामा दिला. आता हे सर्व नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. भाजपचे प्रभारी प्रदेश सरचिटणीस सुजितसिंग ठाकूर यांनी या संबंधित माहिती दिली आहे.

काँग्रेसचे माजी उपमहापौर सरजितस‌िंग गील, किशोर यादव, स्नेहा पांढरे, अन्नपूर्णा ठाकूर, नवल पोकर्णा यांनी सोमवारी पालिका आयुक्तांकडे राजिनामे दिले आहेत. कॉग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांना बालेकिल्यातच शह देण्याच्या दिशेने भाजपने तयारी सुरू केली असल्याचे दिसत आहे. कॉंग्रेसच्या नगरसेवकांसोबतच शिवसेनेचे दीपकसिंग रावत, ज्योती खेडकर, वैशाली देशमुख, विजय गुर्रम आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे संदीप चिखलीकर, श्रद्धा चव्हाण या सहा नगरसेवकांनीदेखील पालिका आयुक्तांकडे राजीनामे दिले आहेत. आता हे सर्वच जण भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत.

आणखी काही नगरसेवक भाजपच्या संपर्कात आहेत. येत्या काळात ते भाजपमध्ये प्रवेश करतील आणि नंदेड पालिकेवर भगवा फडकवेल असा विश्वास सुजितसिंग ठाकूर यांनी व्यक्त केला आहे.
बातम्या आणखी आहेत...