आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाच हजारांची लाच घेताना पोलिस कर्मचार्‍यास पकडले

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

परभणी- गुन्हाच्या एफआयआरची प्रत देण्यासाठी पाच हजार रुपयांची लाच मागणार्‍या बोरी (ता. जिंतूर) येथील पोलिस ठाण्यातील पोलिस कर्मचार्‍यास लाचलुचपत प्रतिबंधक खात्याच्या कर्मचार्‍यांनी शुक्रवारी दुपारी रंगेहाथ पकडले.
जिंतूर तालुक्यातील कौसडी येथील बाबूराव सोनवणे व त्यांची पत्नी सुमन सोनवणे यांचा शेतीच्या कारणावरून विठ्ठल अंबुरे यांच्याशी वाद झाला होता. या वेळी विठ्ठल अंबुरे यांनी सुमन सोनवणेचा विनयभंग केला. याप्रकरणी 12 ऑगस्ट रोजी बोरी पोलिस ठाण्यात अंबुरे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. तक्रारीची एफआयआरची प्रत देण्याची मागणी सोनवणे यांनी बोरी पोलिस ठाण्यातील पोलिस हेड कॉन्स्टेबल आर.एन.जोशी यांच्याकडे केली होती. अंबुरे तुमच्याविरुद्ध तक्रार देत असून गुन्हा दाखल न होण्यासाठी तसेच प्रत देण्यासाठी सोनवणे यांच्याकडे जोशीने पाच हजारांची मागणी केली. या प्रकारामुळे सोनवणे यांनी लाचलुचपत प्रतिबंध खात्याकडे तक्रार केली. उपविभागीय पोलिस अधिकारी विजय डोंगरे, पोलिस निरीक्षक गोरख दिवे, यांनी ठाण्याच्या परिसरात सापळा रचून सोनवणे यांच्याकडून लाच घेताना पकडले.