आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जालना: पोलिस होण्याची जिद्द असणाऱ्या 50 मुली दत्तक, स्वराज्य फाउंडेशनची बांधिलकी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जालना- सामाजिक बांधिलकीची जोड देवून व्यवसाय करणाऱ्यांची संख्या बोटावर मोजण्याइतकीच आहे. त्यातीलच स्वराज्य फाउंडेशन हे एक आहे. या फाउंडेशनने जिजाऊ दत्तक योजना सरु केली आहे. महिला दिनाचे औचित्यावर खेडेगावातील पोलिस होण्याची जिद्द परंतू, घरची परिस्थीती हलाखीची, खेडेगावातून जालन्यात येण्याचा खडतर प्रवास या विविध कारणांमुळे पोलिस प्रशिक्षण अधुरे राहत असलेल्या निवडक पन्नास मुलींना प्राथमिक प्रशिक्षणापासून ते पोलिस भरती होईपर्यंत दत्तक घेऊन इतर व्यावसायिकांसमोर एक आदर्श निर्माण केला आहे. 

स्वराज्य फाउंडेशनच्या वतीने नेहमी विविध सामाजिक उपक्रम राबवल्या जातात. यापूर्वी माणुसकीची भिंत, अर्ध्या रकमेत पुस्तके, गरजवंत, वंचित घटकांतील विद्यार्थी, विद्यार्थिनींना मोफत प्रशिक्षण आदी उपक्रम राबवतात. या उपक्रमासाठी प्रा. विजय सुरासे हे परिश्रम घेतात. ५० मुली दत्तक घेऊन त्यांच्या प्रशिक्षण देण्यासाठी विविध शिक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे. बुधवारी झालेल्या या कार्यक्रमाला याप्रसंगी प्रा. बी. वाय. कुलकर्णी, प्रा.मुकुंद कुलकर्णी, प्रा. विजय सुरासे, गणेश दाभाडे आदींची उपस्थिती होती. या वेळी उपस्थित असलेल्य मान्यवरांनी या उपक्रमाचे कौतूक करुन इतर शैक्षणिक संस्थांनीही या उपक्रमाचा आदर्श घ्यावा, असे आवाहन केले. 

- ०४ प्रशिक्षकांमार्फत प्रशिक्षण दिले जाणार आहे. याला चांगला प्रतिसाद मिळत आहे. 
- ०२ तास शारिरीक तर चार तास घेतला जाणार दररोज सराव 

हे देणार प्रशिक्षण 
दत्तकघेतलेल्या मुलींना शारीरिक चाचणीची तयारी, लेखी परीक्षेची संपूर्ण तयारीसाठी तज्ज्ञांकडून विनामूल्य मार्गदर्शन करण्यात येणार आहे. मुलींकडून अभ्यास करतांना मागील प्रश्नपत्रिकांचा आढावा, प्रश्न पत्रिकेचा पॅर्टन, प्रश्न विचारण्याची पद्धत, स्वरूप काठीण्य पातळी योग्य संदर्भ ग्रंथाव्दारे मार्गदर्शन करणार. 

वेगळा उपक्रम 
ग्रामीणभागातील विविध खेड्या - पाड्यापर्यंत स्पर्धा परीक्षा पोहोचली आहे. म्हणून मोफत कार्यशाळेत जिल्ह्यातील सर्वसामान्य कुटुंबातील ५० युवतींना जिजाऊ दत्तक योजनेतून शैक्षणिक दत्तक घेऊन स्पर्धा परीक्षेचे शिक्षण विनाशुल्क देण्यात आले आहे. सामाजिक बांधिलकी म्हणून हा उपक्रम राबवण्यात आला असल्याचे प्रा.सुरासे म्हणाले. 
बातम्या आणखी आहेत...