आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • 50 Goats Dead Under Railway Near Parali, Shephaeard Cry

परळीजवळ रेल्वेखाली चिरडून 50 मेंढ्या ठार, मेंढपाळांवर रडण्‍याची वेळ

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
परळी वैजनाथ - शहरातील फुके कुटुंबाचा वडिलोपार्जित मेंढीपालन व्यवसाय कालपर्यंत व्यवस्थित सुरू असताना रात्री कळपात रानडुक्कर घुसले आणि सैरावैरा धावणा-या पन्नास मेंढ्या मलकापूर शिवारात रेल्वेखाली चिरडून ठार झाल्या. मेंढ्यांचा शोध घेत फिरणा-या मेंढपाळांवर रक्ताचा सडा पडलेल्या रेल्वेपटरीवर धाय मोकलून रडण्याची वेळ आली.
परळी वैजनाथ येथील होळकर चौकातील राजाभाऊ साधू फुके यांचा मेंढीपालनाचा वडिलोपार्जित व्यवसाय आहे. त्यांना मुलगा दत्ता व्यवसायात मदत करतो. वैजवाडी शिवारातील शेतक-याकडे चा-याच्या बदल्यात मेंढ्या बसवण्यात आल्या होत्या. कळपात लहान मोठ्या 80 मेंढ्या होत्या. गुरुवारी सायंकाळी बाप-लेक मेंढ्या जाळीत कोंडून झोपी गेले. मध्यरात्री एकच्या सुमारास कळपात रानडुक्कर घुसले. रानडुकराच्या धास्तीने मेंढ्या सैरावैरा पळू लागल्या. राजाभाऊ व दत्ता फुके या दोघांनी मेंढ्या अडवण्याचा प्रयत्न केला. परंतु जाळी तोडून मेंढ्यांनी मुख्य रस्ता धरला. याच रस्त्याला लागून परळी - हैदराबाद रेल्वेमार्ग जातो. तेथून मेंढ्यांचा कळप पटरीवरून जात होता. याचवेळी तेथून जाणा-या रेल्वेखाली पासष्ट मेंढ्या आल्या.
कुटुंबाचा टाहो
दत्ता फुके यांनी परळी शहर व परिसरात मेंढ्यांचा शोध घेतला. रात्री दोन वाजता मलकापूर शिवारात मेंढ्यांचा सडा रेल्वे पटरीवर दिसला. उदरनिर्वाहाचे साधन संपल्याने कुटुंबाने टाहो फोडला. जखमी मेंढ्याजवळ राजाभाऊ फुके दहा तास बसून होते.
23 मेंढ्या बेपत्ताच
सकाळी जाऊन घटनेचा पंचनामा केला. बेचाळीस मेंढ्या मृतावस्थेत सापडल्या आहेत. तेरा मेंढ्या गंभीर जखमी, तर दोन चांगल्या स्थितीत आढळल्या. तेवीस मेंढ्यांचा शोध लागू शकलेला नाही. याचा अहवाल वरिष्ठांकडे पाठवला आहे. मुख्यमंत्री सहायता निधीतून मदत मिळू शकते.
संभाजी मगरे, तहसीलदार, परळी