आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • 53 Students Consuming Poison Through Meal In Patoda Taluka

पाटोदा तालुक्यात जेवणातून 53 विद्यार्थ्यांना विषबाधा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पाटोदा - बाजरीची भाकरी व बटाट्याच्या भाजीतून 53 विद्यार्थ्यांना विषबाधा झाली. पाटोदा तालुक्यातील चुंभळी गावातील हंगामी वसतिगृहात मंगळवारी सकाळी साडेनऊ वाजेच्या सुमारास ही घटना घडली.
जिल्हा परिषदेने ऊसतोडणी कामगार मुलांसाठी चुंभळी गावात हंगामी वसतिगृह सुरू केले आहे. बुधवारी सकाळी 89 विद्यार्थ्यांसाठी बाजरीची भाकरी व बटाट्याची भाजी तयार करण्यात आली. जेवण केल्यानंतर मुलांना काही मिनिटांतच चकरा येऊन उलट्या होण्याचा त्रास सुरू झाला. सुरुवातीला 53 पैकी 39 विद्यार्थ्यांना पाटोदा येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. यातील 14 जणांची प्रकृती खालावल्याने त्यांना बीडच्या जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ही विषबाधा जेवणातूनच झाली असल्याचे पाटोदा येथील ग्रामीण रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. भीमा जायभाय यांनी सांगितले.