आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘मांजरा’चे सहा दरवाजे पुन्हा उघडले; 150 घनमीटरने विसर्ग

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
केज- केज शहरासह तालुक्यात शनिवारी रात्री वादळी वारे आणि विजांच्या कडकडाटासह झालेल्या मुसळधार पावसाने ओव्हरफ्लो असलेल्या धनेगाव (ता. केज) येथील मांजरा धरणात पाण्याची आवक वाढल्याने पुन्हा धरणाचे सहा दरवाजे २५ सेंमी ने उघडण्यात आले. मांजरा नदीत १५० घनमीटर प्रती सेकंद वेगाने पाण्याचा विसर्ग होत आहे.  

केज तालुक्यात शनिवारी रात्री वादळी वाऱ्यासह पावसाला सुरुवात झाली. रात्री साडेअकरा  वाजेपर्यंत विजांच्या प्रचंड कडकडाटासह मुसळधार पाऊस झाल्याने नदी, नाल्याला भरती आली होती. वादळी वारे आणि पावसाने शेतातील सोयाबीन, ऊस, शेंदरी, कापूस पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. धनेगाव येथील मांजरा प्रकल्प २२ सप्टेंबर रोजी  ओव्हरफ्लो झाल्याने धरणाचे सहा दरवाजे २५ सेंमीने उघडले होते.
 
त्यानंतर पाऊस पडत राहिल्याने दोन दरवाजातून पाण्याचा विसर्ग सुरु होता. मागील आठवड्यात दुसऱ्यांदा धरणाचे सहा दरवाजे उघडून पाण्याचा विसर्ग करावा लागला  होता. शनिवारी रात्री झालेल्या पावसाने पुन्हा सहा दरवाजे उघडून मांजरा नदीत १५० घनमीटर प्रती सेकंद दराने पाण्याचा विसर्ग होत आहे.
बातम्या आणखी आहेत...