आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मिनीबस-ट्रक धडकेत जालन्याचे भाविक 6 मृत्युमुखी

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बीड - पंढरपूर, अक्कलकोट, कोल्हापूर, तुळजापुरात दर्शन घेऊन परतणा-या जालन्याच्या भाविकांच्या मिनीबसला कांदा घेऊन जाणा-या ट्रकने धडक दिल्याने सहा जणांचा मृत्यू झाला. यात 5 जण गंभीर जखमी आहेत. धुळे-सोलापूर महामार्गावर रौळसगावनजीक सोमवारी पहाटे हा अपघात झाला. सुभाष खर्डेकर कुटुंबीयांसह 11 जण शनिवारी देवदर्शनासाठी गेले होते. नेकनूर पोलिसांनी ट्रक ताब्यात घेतला आहे.