आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जैन मंदिर फोडून एक हजार वर्षे जुन्या 6 मूर्ती लंपास

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हिंगोली- हिंगोली जिल्ह्यातील आसेगावातील (ता.वसमत) प्राचीन चिंतामणी पार्श्वनाथ दिगंबर जैन मंदिराचे लोखंडी प्रवेशद्वार तोडून चोरट्यांनी सहा पितळी मूर्ती लंपास केल्या. शनिवारी पहाटे १ ते ४:३० च्या दरम्यान चोरट्यांनी मंदिराचे पुजारी कुलभूषण अशोककुमार मिरकुटे राहत असलेल्या खोलीची बाहेरून कडी लावून चोरी केली. 

विशेष म्हणजे मंदिरातील चांदीच्या मूर्तींना चोरट्यांनी हात लावला नाही. या प्रकरणी वसमत ग्रामीण पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. पार्श्वनाथ भगवान यांची ११ इंच उंचीची पितळी मूर्ती, भगवान मल्लिनाथ यांची पद्मासन मुद्रेतील ९ इंच उंचीची पितळी मूर्ती, चोविशी पितळी ७ इंच उंचीची मूर्ती, आदिनाथ भगवंतांची ५ इंच उंचीची पितळी मूर्ती, पार्श्वनाथ भगवंतांची साडेतीन इंच उंचीची पितळी मूर्ती, सिद्ध भगवंतांची अडीच इंच उंचीची पितळी मूर्ती अशा साडेदहा हजाराच्या मूर्ती चोरून नेल्या.

मंदिरातील मूर्ती अंदाजे १ हजार वर्षांपूर्वीची असून लाखो लोकांशी आस्था येथे जोडलेली अाहे. चोरट्यांना पकडण्याची मागणी मंदिराचे विश्वस्त दिलीपकुमार दुरुगकर यांनी केली आहे.
बातम्या आणखी आहेत...