आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उस्मानाबाद: 6 वर्षीय कृष्णाचा नरबळीच! गुढ उकलले; आणखी दोघा संशयितांना केली अटक

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
उस्मानाबाद- पिंपळगाव (डोळा) येथील ६ वर्षीय कृष्णाच्या खुनाचे गूढ उलगडण्यात पोलिसांना यश आले आहे. कृष्णाच्या डोक्यात रुमण्याचे घाव घालून खून करण्यात आला होता. हा खून नरबळीचा प्रकार असल्याचे समोर येत असून याप्रकरणी यापूर्वीच एका पुण्याच्या तांत्रिकासह तिघांना अटक करण्यात आली होती. त्यापाठोपाठ आणखी दोघांना अटक झाली असून याबाबत दोन दिवसांमध्ये पोलिसांकडून खुलासा होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.  

पिंपळगाव डोळा येथील कृष्णा गोरोबा इंगोले हा २६ जानेवारी रोजी झेंडावंदनानंतर घरी परतला. त्यानंतर खेळायला जातो म्हणून गेला तो परतलाच नाही. शोधाशोध झाली, मात्र दुसऱ्या दिवशी २७ जानेवारी रोजी गावशिवारातील गोवर्धन टेकाळे यांच्या शेतात त्याचा मृतदेह आढळून आला होता.
 
दरम्यान, ४ फेब्रुवारी रोजी लखन चुडावकर (पुणे), उत्तम इंगोले, ऊर्मिला  इंगोले यांना अटक केली होती. त्याच वेळी पोलिसांना हे प्रकरण नरबळीचे असण्याचा संशय आला होता. ९ एप्रिल रोजी पिंपळगाव (डोळा) येथून द्रौपदी पौळ या महिलेस, तर दुसऱ्याच दिवशी १० रोजी साहेबराव प्रल्हाद इंगोले (५२) या आणखी एका संशयिताला अटक केली असून दोघांना न्यायालयाने १३ एप्रिलपर्यंत पोलिस कोठडी दिली आहे. दरम्यान,  या प्रकाराने उस्मानाबाद जिल्ह्यात खळबळ उडाली असून तपास यंत्रणा कामाला  लागली आहे.

नातेवाइकाचा कट ?   
मिळालेल्या माहितीनुसार, कृष्णा या चिमुकल्याचा नरबळी देण्याच्या प्रकरणातून खून करण्यात आल्याचे समोर आले असून यामध्ये त्याच्या नात्यातीलच माणसांचा समावेश आहे. यासाठी पुणे येथील तांत्रिक बाबा चुडावकरची मदत घेण्यात आली असून हा नरबळी नेमका कोणत्या हव्यासातून देण्यात आला हे मात्र अद्याप स्पष्ट झालेले नाही.
बातम्या आणखी आहेत...