आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

६७ लाखांची फसवणूक, निलंगा पोलिस ठाण्‍यात गुन्हा दाखल

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लातूर - पुणे येथील कोळपे पाटील मल्टिस्टेट को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीच्या चेअरमनसह संचालकांवर ६७ लाख ५४ हजार १३८ रुपयांची फसवणूक केल्याचा गुन्हा निलंगा पोलिस ठाण्यात रविवारी दाखल करण्यात आला.

सदर सोसायटीच्या लातूर जिल्ह्यात ठिकठिकाणी शाखा असून त्यात अनेकांनी गुंतवणूक केली आहे. निलंगा येथील सेवानिवृत्त शिक्षक दिगंबर आनंदराव चौधरी यांनी या सोसायटीत मुदत ठेव म्हणून १५ लाख २६ हजार, बचत खात्यावर पाच लाख रुपये ठेवले होते. मुदत पूर्ण झाल्यानंतर त्यांना २२ लाख २२ हजार ३०२ रुपये सोसायटीकडून येणे अपेक्षित होते. परंतु मुदत पूर्ण झाल्यानंतरही त्यांना रक्कम मिळाली नाही. लातूर जिल्ह्यातील लातूर, तांदूळजा, औराद शहाजानी, निटूर, उदगीर, नळेगाव आदी सोसायटीच्या शाखांतही ३२ ठेवीदारांनी ४५ लाख ३१ हजार रुपयांची गुंतवणूक केली होती. त्यांनाही मुदत पूर्ण झाल्यानंतर रक्कम मिळाली नाही. त्यामुळे एकूण ३३ ठेवीदारांची ६७ लाखांची फसवणूक झाल्याची तक्रार दिगंबर चौधरी यांनी निलंगा पोलिसांत दिल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला.