आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शुभवार्ता: पाणी कपातीचे संकट टळले; जायकवाडीत ७.३१ टक्के जलसाठा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पैठण- सलग तीन वर्षे मराठवाड्याला जायकवाडीच्या मृत जलसाठ्यातून पाणीपुरवठा करावा लागला होता. यंदा मात्र जूनच्या अखेरपर्यंत तरी पाणीसाठा मृतसाठ्यावर येणार नाही. त्यामुळे यावर्षी प्रथमच पाणी कपातीचे संकट टळले आहे. सध्या जायकवाडी धरणाचा पाणीसाठा ७.३१ टक्के आहे. त्यामुळे औद्योगिक वसाहतीसह विविध योजनेच्या पाणीपुरवठ्यांना तूर्तास दिलासा मिळाला आहे.

पैठण येथील जायकवाडी धरणात उपलब्ध पाण्यावर औरंगाबाद, जालना, पैठण, नांदेड, परभणी, बीड यासह ३५० पाणीपुरवठा योजनेला पाणी दिले जाते. मागील तीन वर्षे पाण्याचे नियोजन फसल्याने सलग तीन वर्षे धरणाच्या मृत जलसाठ्यातून पाणी उपसा करण्याची वेळ प्रशासनावर आली होती. नियोजनाअभावी पिण्याच्या उद्योगाच्या पाण्यात कपात पाटबंधारे विभागाने केली होती. मात्र, गेल्या वर्षापासून ‘दिव्य मराठी’ने पाणी कपातीचे नियोजनावर वृत्त मालिका प्रसिद्ध केल्यानंतर सिंचन, पिण्याच्या पाण्याचे योग्य नियोजन प्रशासनाने केले. यामुळे आज पाणी कपातीची संकट टळले आहे. जूनअखेरपर्यंत तरी पाणी कपात करावी लागणार नाही, असे पाटबंधारे विभागाने स्पष्ट केले.

नियोजनप्रभावी : सततपाणी बचतीची मोहिम दिव्य मराठीने राबवल्याने प्रशासनाने पाण्याचे प्रभावी नियोजन केल्याने धरणात यंदा मुबलक पाणीसाठा आहे.

जायकवाडी धरणातून औरंगाबादसह, जालना, परभणी, नांदेड बीड येथील योजनांना होतो पाणीपुरवठा.

पाणीपुरवठा योजनांसाठी पाणी
३५० तीन वर्षांतील साठ्याची स्थिती

पाणी बचत करण्याचे आवाहन
पावसाळावेळेवर सुरू झाला नाही तर पाण्याची मागणी आणखी वाढेल, याचा विचार करून पाणी बचत करण्याचे आवाहन पाटबंधारे विभागाने केले आहे.

तीन वर्षे जलसाठा होता मृतसाठ्यावर
तीनवर्षे भीषण दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली होती. प्रत्येक मे महिन्यात सलग तीन वर्षे जायकवाडी धरणाचा पाणीसाठा मृतसाठ्यावर आला होता. यंदा प्रथमच जायकवाडीत मे महिन्यात टक्के जलसाठा आहे. आता पाणी समस्या जाणवणार नाही.

बाष्पीभवनाचे प्रमाण वाढले
बाष्पीभवनहोण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. मात्र, यामुळे धरणाच्या पाणीसाठ्यात घट होत अाहे, परंतु तरी पाणी कपात अथवा इतर उपाययोजना करण्याची गरज नाही, असे कार्यकारी अभियंता संजय भर्गोदेव यांनी सांगितले.

वरील धरणातून एकदा आले पाणी- जायकवाडीमध्ये गेल्या पावसाळ्यात भंडारदरा, दारणातून टीएमसी पाणी साेडण्यात आले होते. यापैकी ४.५० टीएमसी पाणी जायकवाडीत आले होते. त्यावेळी साठा ४७ टक्क्यांवर पोहचला होता. दोन पाणी पाळ्या, परळीलाही पाणी- धरणाच्या पाणीसाठा ४७ टक्क्यावर गेल्याने धरणातून मराठवाड्यातील ४० हजार हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येईल. यासाठी दोन वेळा शेतीला पाणी सोडण्यात आले.शिवाय आपेगाव, हिरडपूरी बंधा ऱ्यात तीन वेळा पाणी सोडले होते. तर परळीला थर्मलसाठी पाणी सोडण्यात आले होते.

मे २०१५- ७.३१ टक्के पाणीसाठा
उन्हाळ्यात अवकाळी पावसाने पाणीसाठयात घट नाही- दिवाळीपासूनसलग दरमहिन्याला अवकाळी पावसाची हजेरी असल्यामुळे बाष्पीभवनाचे प्रमाण कमी झाले आहे. शिवाय साठ्यात पाणी बचत झाल्याने पावसाळ्यापर्यंत तरी जायकवाडीत आता मुबलक साठा राहील
बातम्या आणखी आहेत...