आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

7 अधिकारी, कर्मचाऱ्यांचा एक वर्षाचा पगार कापणार; तलाव खोदल्‍याचे बोगस दाखवले

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बीड - अंबाजोगाई तालुक्यातील वाकडी येथील शेतकरी रंगनाथ यमाजी कांदे यांच्या शेतातील तलाव खोदल्याचे बोगस दाखवून २ लाख ९०  हजार रुपयांची शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी अंबाजोगाई येथील गटविकास अधिकाऱ्यांसह तालुका कृषी अधिकारी, ग्रामरोजगार सेवक व अन्य सात जणांना बीड येथील तक्रार निवारण प्राधिकारी एस.जी.फुंदे यांनी  दोषी ठरवले आहे. सात अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या एक वर्षाच्या वेतन  कपातीचा हा निकाल मग्रारोहयोच्या तक्रार निवारण प्राधिकाऱ्याने दिला आहे.
 
वाकडी येथील शेतकरी रंगनाथ कांदे यांनी शेततलाव मंजूर करून घेतल्यानंतर  प्रशासकीय गट नंबर ९४ मध्ये असताना प्रत्यक्षात शेततलाव न खोदता मावेजा लाटला. याप्रकरणी शेतकरी ज्ञानेश्वर कांदे यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार केल्यानंतर प्रकरणाची चौकशी सुरू झाली. यानंतर कांदे  यांच्यासह ग्रामस्थांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणही केले. जिल्हाधिकाऱ्यांनी दखल घेत प्रकरण बीडच्या मग्रारोहयो तक्रार निवारण प्राधिकारी यांच्याकडे वर्ग केले. या प्रकरणात सुनावणीअंती  अंबाजोगाई पंचायत समितीचे गटविकास अधिकारी, तालुका कृषी अधिकारी, ग्रामरोजगार सेवक गणेश माने यांच्यासह  लाभार्थी रंगनाथ कांदे ,पंचायत समितीचे तत्कालीन अभियंता नागरगोजे, कृषी अधिकारी मोरे यांना तक्रार निवारण प्राधिकरणाने  १५ जून २०१७ रोजी दोषी ठरवले.
बातम्या आणखी आहेत...