आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खंडणी मागणारे 7 जण गजाआड

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बीड - धर्मापुरी ते पानगाव रस्त्यावरून लातूर येथील व्यापाºयाचे शनिवारी अपहरण झाल्यानंतर बीड, अंबाजोगाई आणि लातूरच्या पोलिसांनी दहा तासांच्या आत व्यापाºयाची सुटका करून अपहरण करणाºया सात जणांना अटक केली आहे.
लातूर येथील व्यापारी प्रदीप बाळू बाहेती शनिवारी इलेक्ट्रिक वस्तूंची विक्री करून परत लातूरला रिक्षाने (एमएच 24-ए 6810) निघाले. धर्मापुरी ते पानगाव रस्त्याने जाताना त्यांच्या रिक्षापुढे एक पांढरी इंडिका कार (क्रमांक नसलेली) आडवी लावली. एक दुचाकीही आडवी लावली. दुचाकीवरील दोघांनी रिक्षातून व्यापारी प्रदीप बाहेती व नोकर शंकर या दोघांना लाकडी दांड्याने मारहाण करून 25 ते 30 हजार रुपये जबरीने लुटले. त्यानंतर इंडिका कारमध्ये टाकून त्यांचे अपहरण केले. त्यानंतर रिक्षाचालक सुदर्शन शिवाजीराव वाघमारे (रा. नगर) याने बर्दापूर पोलिस ठाण्यामध्ये या प्रकरणाची तक्रार दिली. त्यानुसार अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला.
अपहरणाची माहिती पोलिस अधीक्षक दत्तात्रय मंडलिक यांना समजताच त्यांनी घटनास्थळी भेट दिली. तसेच पोलिस उपअधीक्षक स्वाती भोर, स्थानिक गुन्हे शाखा व बर्दापूर ठाण्यासह तातडीने तीन पथके स्थापन केली.
पथकांतील पोलिसांनी धर्मापुरी-पानगाव रोडवरील बोरगावात जाऊन संशयित अपहरणकर्ता पांडुरंग दासराव रोंगे याची माहिती घेतली. पोलिसांनी शेतातील गोठ्यावर छापा टाकून व्यापारी बाहेतींसह नोकर शंकर या दोघांची सुटका केली. मात्र, अपहरणकर्ते फरार झाले.
पोलिसांनी पाठलाग करून श्रीनिवास तेरबाजी शिंदे, पांडुरंग रोंगे या दोघांना अटक केली. त्यांनी दिलेल्या माहितीवरून बीडच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अहमदपूर आणि औसा येथे छापे टाकून श्रीनिवास शिंदे, अनिल हरिभाऊ सूर्यवंशी, शेख नसीर शेख इस्माईल, अनिल जिजाराम गायकवाड, दत्ता दासराव रोंगे या पाच जणांना अटक केली असून दयानंद कोरडे हा फरार झाला आहे.