आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बीड जिल्ह्यात वीज कोसळून सहा जणांचा मृत्यू, धारूर- माजलगावमधील घटना

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मराठवाड्यात वीज कोसळण्याचे सत्र सुरूच आहे. - Divya Marathi
मराठवाड्यात वीज कोसळण्याचे सत्र सुरूच आहे.
धारूर / माजलगाव- धारूर तालुक्यातील चारदरी येथील घागरवाडा माळावर एका झाडाखाली बसलेल्या लोकांवर वीज कोसळून ५ जण ठार तर ५ जण जखमी झाल्याची घटना शनिवारी दुपारी ४ वाजताच्या सुमारास घडली. तर माजलगाव तालुक्यातील लोनगाव येथेही एका महिलेचा वीज कोसळून मृत्यू झाला.
 
शनिवारी दुपारी धारूर आणि माजलगाव तालुक्यातील काही भागात वादळी वारे आणि विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाउस झाला. यावेळी दुपारी ४ वाजताच्या सुमारास धारूर तालुक्यातील चारदरी येथील शेतात बाजरी काढण्यासाठी गेलेल्या दहा व्यक्ती पावसामुळे घागरवाडा माळावर एका झाडाखाली बसल्या असता झाडावर वीज कोसळून खाली उतरली. 
या दुर्घटनेत आसाराम रघुनाथ आघाव (वय २८), उषा आसाराम आघाव (वय २५), दिपाली मच्छींद्र घोळवे (वय २१), शिवशाला विठ्ल मुंडे (वय २१) आणि वैशाली संतोष मुंडे (वय २५) हे जागीच ठार झाले तर सुमन भगवान तिडके (वय ४५), रुक्मीन बाबासाहेब घोळवे (वय ५२), कुसाबाई नामदेव घोळवे (वय ४५), सिताबाई दादासाहेब घोळवे (वय २५), सुरेखा आबासाहेब आघाव (वय १७) हे पाच जण जखमी झाले असून त्यांच्यावर धारूर ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
 
 याच सुमारास माजलगाव तालुक्यातील लोणगाव शेतात मशागतीची कामे करत असताना पाऊस आल्यामुळे लिंबाच्या झाडाखाली थांबलेल्या राधाबाई दामोदर कोळसे (वय ५५) या महिलेचा वीज कोसळून करून अंत झाला.

मौजे राहाटगाव येथे यशोदाबाई संदीप फासाटे अंदाजे वय 21 यांचा अंदाजे  वेळ शनिवारी सायंकाळी 4 ते 5 च्यादरम्यान वीज पडून  मृत्यु झाला. सत्यभामाबाई आप्पासाहेब फासाटे व सरीता ज्ञानेश्वर फासाटे या दोन महिला जखमी असून  त्यांच्यावर शासकीय रुग्णालयात पैठण येथे उपचार सुरू आहेत. या घटनेची चौकशी व पंचनामा करण्यासाठी तलाठी रहाटगाव श्री. पुपले यांना तात्काळ घटनास्थळी पाठवून चौकशी व घटनेचा पंचनामा तात्काळ करण्यात आला. 
बातम्या आणखी आहेत...