आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भावकीच्या वादातून 8 वर्षीय बालकाला विहिरीमध्ये ढकलले, आरोपीविरोधात खूनाचा गुन्‍हा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
गोंदेगाव/बनोटी - भावकीच्या वादातून शेतात नेऊन आठ वर्षीय बालकाला विहिरीत ढकलून दिल्याची घटना सोयगाव तालुक्यातील मोहळाई येथे गुरुवारी सायंकाळी उघडकीस आली. रूपेश मानसिंग परदेशी असे मृत चिमुकल्याचे नाव असून आरोपी हृषिकेश दीपक परदेशी (१८) याच्याविरुद्ध पाचोरा पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा नाेंद झाला.
 
औरंगाबाद-जळगाव जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या मोहळाई येथे आठ वर्षीय रूपेश घरासमोर खेळत होता. दरम्यान, घराशेजारी राहणाऱ्या हृषिकेश परदेशी याने आवाज देऊन शेतात जाऊन येऊ सांगितल्यावर रूपेश त्याच्या सोबत गेला. रस्त्यावर जळगाव जिल्ह्यातील हद्दीत लागलेल्या विहिरीजवळ नेऊन भावकीच्या वादाचा बदला घेण्यासाठी रूपेशचा गळा दाबून विहिरीत फेकून दिल्याने त्यात त्याचा मृत्यू झाला. सायंकाळी रूपेशचे आई-वडील शेतातून घरी आल्यावर रूपेश दिसत नसल्याने गावात त्याचा शोध घेतला. परंतु मिळून आला नाही. दरम्यान, गावातील दोन महिलांनी हृषिकेशसोबत रूपेश  शेतात जात असल्याचे पाहिले होते, असे सांगितल्याने हृषिकेशवर घरच्यांचा संशय बळावला. हृषिकेशच्या शेतात जाऊन शोध घेतला असता रूपेश कोठेही दिसत नसल्याने शेतातील विहिरीजवळ चपला आढळल्या व विहिरीत रूपेशचा मृतदेह दिसून आला.

वडील मानसिंग परदेशी यांनी बनोटी दूरक्षेत्रात दिलेल्या फिर्यादीवरून पोलिस निरीक्षक सुजीत बडे, सहायक पोलिस निरीक्षक जी. ए.जागडे, जमादार सुभाष पवार, योगेश झाल्टे, सतीश पाटील, दीपक पाटील यांनी मध्यरात्री घटनास्थळी जाऊन आरोपी हृषिकेश परदेशीला जळगाव जिल्ह्यातील बांबरूळ (ता. पाचोरा) येथून ताब्यात घेतले. घटनास्थळ जळगाव जिल्ह्यात येत असल्याने पाचोरा पोलिस ठाण्यात हृषिकेश परदेशीवर गुन्हा दाखल झाला. उपविभागीय पोलिस अधिकारी  केशव पातोडे यांच्या मार्गदर्शनाखाली पाचोरा पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक श्यामकांत सोमवंशी, प्रदीप चादेलकर, वसंत पाटील, श्यामकांत पाटील, राहुल सोनवणे आदी तपास करीत आहेत.
बातम्या आणखी आहेत...