आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ग्राम पंचायत स्थरावर विक्रमी ८० टक्के मतदान

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- जिल्ह्यातपहिल्या टप्प्यात ५८७ पैकी ३२ ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या आहेत. उर्वरित ५५५ ग्रामपंचायतींच्या निवडणुक रिंगणात १२, ५१८ उमेदवार निवडणुक रिंगणात होते. त्यातून १२,०७९ पदाधिकारी निवडीसाठी मंगळवारी (४ ऑगस्ट) १,९४४ मतदान केंद्रावर किमान हजार ईव्हीएम मशीनच्या माध्यमातून मतदान घेण्यात आले. सकाळपासूनच जिल्ह्यात सर्वत्र रिमझिम पाऊस सुरू झाला होता. त्यामुळे अनेक ठिकाणी मतदारांनी सकाळीच घराबाहेर येणे टाळल्याचे पाहावयास मिळाले. परंतु मध्यंतरी काही काळासाठी पाऊस थोडा थांबल्याने अनेकांनी मतदान केंद्र गाठून मतदान करण्यासाठी केंद्राबाहेर रांगा लावल्याचे दिसून आले. दिवसभरात पैठण, औरंगाबाद, कन्नड, वैजापूर, फुलंब्री, खुलताबाद, सोयगाव, गंगापूर, सिल्लोड या तालुक्यांत किमान ८० टक्के मतदान झाल्याचा दावा प्रशासनाच्या वतीने करण्यात आला आहे.

जिल्हाभरात मतदान प्रक्रिया सुव्यवस्थित पार पडावी, यासाठी प्रशासनाच्या वतीने १,९४४ मतदान केंद्रांवर २५० निवडणूक निर्णय अधिकारी, २८० सहायक निवडणूक निर्णय अधिकारी, १५१ क्षेत्रीय अधिकारी आणि हजार ७४ मतदान केंद्राध्यक्ष, असे सुमारे हजार ७८ कर्मचारी कार्यरत होते. याशिवाय मतदानाच्या वेळी कुठेही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी किमान हजार पोलिस कर्मचाऱ्यांचा ताफा या मतदान केंद्रावर तैनात करण्यात आला होता. मतदानपेट्या कर्मचारी ने-आण करण्यासाठी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या १६६ बसेसची प्रशासनाच्या वतीने व्यवस्था करण्यात आल्याचे पाहावयास मिळाले.
पहिल्या टप्प्यात औरंगाबाद तालुक्यातील ७२ ग्रामपंचायतींमधून ७२५ उमेदवार रिंगणात होते. दिवसभरात या तालुक्यात ८५ टक्के तर पैठण तालुक्यात ७८ ग्रामपंचायतींमधून ६९४ उमेदवार निवडणूक रिंगणात होते. या तालुक्यात ८० टक्के मतदान झाले. फुलंब्रीत ४० ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत ३२५ उमेदवार रिंगणात होते. या तालुक्यात ८५ टक्के आणि सोयगावात ३६ ग्रामपंचायतींसाठी ७६७ उमेदवार निवडणूक रिंगणात होते. याठिकाणी ७० टक्के मतदान झाले. याशिवाय सिल्लोड तालुक्यात ६७ ग्रामपंचायतींसाठी मतदान घेण्यात आले. याठिकाणी सर्वाधिक १,६१६ उमेदवार निवडणूक रिंगणात होते. याठिकाणी ७५ टक्के मतदान झाले. वैजापूर तालुक्यात ९६ ग्रामपंचायतींसाठी १,७४५ उमेदवार रिंगणात होते. यात ८३.३४ टक्के मतदान झाले. गंगापुरात ६५ ग्रामपंचायतींसाठी १,५७५ उमेदवार असून ८० टक्के मतदान झाले. खुलताबादेत २५ ग्रामपंचायतींमधून ५९७ उमेदवार हाेते. या ठिकाणी ८३ टक्के मतदान झाले. तर कन्नडमध्ये ७७ ग्रा.प.साठी ८५ टक्के मतदान झाले.
औरंगाबाद तालुक्यात ७२ ग्रा.पं.साठी मतदान
औरंगाबादतालुक्यात ७६ पैकी ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या आहेत. उर्वरित ७२ ग्रामपंचायतींसाठी मतदान घेण्यात आले. यात करमाड पोलिस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या ३३ ग्रामपंचायतींचा समावेश होता. मंगळवारी सकाळी वाजेपासून रिमझिम पाऊस पडण्यास सुरुवात झाली. त्यामुळे दिवसभर पावसातही मतदारांनी मतदान केंद्रांवर रांगा लावून मतदान केले. दिवसभरात कुठेही अनुचित प्रकार घडला नाही, अशी माहिती पोलिस अधिकारी सूर्यकांत पोकणे यांनी दिली.
पुढील स्लाइड्सवर पाहा, कसे झाले तालुका निहाय मतदान