आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रेल्वेत झाेपेत असलेल्या दाेन प्रवाशांना लुटले, ८० हजारांचा ऐवज लंपास

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
परळी- नगरसोल -तिरुपती रेल्वेत प्रवाशांना लुटल्याची खळबळजनक घटना घडली आहे. यात ८० हजारांचा ऐवज लंपास केला आहे. विशाखापट्टणम येथील सॉफ्टवेअर इंजिनिअर असलेले मोहिनीकुमार आणि जगन्नाथ नंदुला या दोन प्रवाशांचे मोबाइल, अंगठी, सोन्याची चेन आदी सुमारे ८० हजारांचा ऐवज लंपास केला आहे. अज्ञात चोरट्यांनी आज पहाटेच्या सुमारास झोपेत असलेल्या प्रवाशांना लुटले आहे. या घटनेने रेल्वे प्रवासात दहशत निर्माण झाली आहे. त्यामुळे रेल्वेच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. याप्रकरणी परळी रेल्वे पोलिस ठाण्यात रविवारी नाेंद झाली अाहे.
  
परळी-परभणी रेल्वे मार्गावर नेहमीच रेल्वे प्रवाशांना चोरट्यांचा सामना करावा लागतो. यापूर्वी गंगाखेड ते परळीदरम्यान प्रवाशांना लुटणे, चोऱ्या अशा घटना नेहमीच घडलेल्या आहेत. रेल्वे प्रवासादरम्यान सुरक्षेचा प्रश्न नेहमीच चर्चेचा ठरत आलेला आहे. मात्र घटनेनंतर काही दिवस रेल्वे प्रशासन व पोलिस काळजी घेतात. त्यानंतर पुन्हा जैसे थे परिस्थिती निर्माण होते. याचाच प्रत्यय रविवारी पहाटेच्या सुमारास प्रवाशांना आला आहे. चालत्या रेल्वेतील प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.  
बातम्या आणखी आहेत...