आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मृत जवानाला नेणाऱ्या जवानांचा टेम्पो उलटला; 9 जवान जखमी, परळीजवळ अपघात

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

धारुर/बीड- परळी येथे मृत जवानाला शासकीय इतमामातील अंत्यसंस्कारावेळी मानवंदना देण्यासाठी अहमदनगरहून परळीकडे जाणारा भारतीय लष्कराचा टेम्पो परळी रस्त्यावर तेलगावजवळ रविवारी दुपारी दीड वाजता उलटला. ट्रॅक्टरला ओव्हरटेक करताना हा अपघात घडला. यामध्ये नऊ जवान जखमी झाले असून दोघांची प्रकृती गंभीर आहे. दरम्यान, एका मेजरचा पाय टेम्पोखाली अडकल्याने तब्बल अर्ध्या तासाच्या प्रयत्नानंतर सीट तोडून या जवानाला बाहेर काढण्यात आले. जखमींवर जिल्हा रुग्णालय, अंबाजोगाईच्या एसआरटी रुग्णालयात उपचार करण्यात आले. भारतीय लष्करात चंदिगड येथे कार्यरत असलेले परळी येथील जवान मुरलीधर शिंदे यांचे शनिवारी निधन झाले. शासकीय इतमामात रविवारी त्यांच्यावर परळीत अंत्यसंस्कार करण्यात आले. दरम्यान, भारतीय लष्काराकडून शिंदे यांना मानवंदना देण्यासाठी अहमदनगर येथील लष्करी छावणीतील १४ जवान परळीकडे जात लष्करी टेम्पोतून जात होते. 

 

समोरच काही अंतरावर रुग्णवाहिकेतून मधुकर शिंदे यांचे पार्थिव होते.दरम्यान, तेलगाव जवळ वेगात ब्रेक दाबल्याने टेम्पोवरील नियंत्रण सुटून रस्त्याच्या उजव्या बाजूला जाऊन टेम्पो पलटी झाला. या अपघातात शहाजी नायर, प्रविण थोरात, अंग्रेजसिंग भोलासिंग, धर्मेंद्रकुमार गणपत  प्रसाद, रघुवीर सिंग, रामनिवास, रामसब रिसोडा, रविंद्रसिंग,  साेमाला सिंग, मानसिंग, राधेश्याम हे वान जखमी झाले आहेत. 

 

सीट तोडून बाहेर काढले
शहाजी नायर हे समोरच्या बाजूला बसलेले असल्याने टेम्पो उलटल्यानंतर त्यांचा पाय सीटखाली अडकला. टेम्पो पायावरच उलटल्याने पाय फ्रॅक्चर झाला. त्यांना गाडीबाहेर काढण्यासाठी प्रयत्न करावे लागले. 

 

पुढील स्लाइडवर क्लिक करून पाहा... जखमी जवानांचे फोटो...

बातम्या आणखी आहेत...