आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

19 दिवसांत राष्ट्रीयीकृत बँकांमध्ये 900 कोटी जमा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
उस्मानाबाद - नोटबंदीनंतर जिल्ह्यातील विविध राष्ट्रीयीकृत बँकांमध्ये आठ अब्ज ८९ कोटी ३४ लाख २९ हजार ५०० रुपयाच्या पाचशे, हजाराच्या नोटा गोळा झाल्या आहेत.
पंतप्रधानांच्या निर्णयानंतर डिसेंबर महिन्यातील ही परिस्थिती आहे. जुने चलन जमा करण्याचा ओघ संथावला असला तरी शेवटच्या टप्प्यात गर्दीची शक्यता वर्तविण्यात येत आहे. केंद्र शासनाने दि. नोव्हेंबरला रात्री हजार पाचशेच्या नोटांवर बंदी घालण्याचा निर्णय जाहीर केल्यानंतर सर्वत्र खळबळ निर्माण झाली. निर्णय जाहीर करत असतानाच जुन्या नोटा बँकांमध्ये जमा करण्यासाठी ३० डिसेंबरची मुदत जाहीर करण्यात आली.
यामुळे हजार पाचशेच्या नोटा बँकांमध्ये जमा करण्यासाठी बँकांमध्ये मोठी झुंबड उडाली. प्रत्येक बँकेच्या शाखेसमोर भल्यामोठ्या रांगा लागल्या. काही बँकांनी थोडेसे औदार्य दाखवत समोर मंडप मारून सावली तयार केली. सध्याही काही ठिकाणी नोटा जमा करण्यासाठीच्या रांगा कमी झालेल्या नाहीत. नोटबंदीचा निर्णय जाहीर केल्यानंतर जिल्ह्यातील नागरिकांनी राष्ट्रीयीकृत बँकांच्या विविध शाखांमध्ये आठ अब्ज ८९ कोटी ३४ लाख २९ हजार ५०० रुपये जमा केले आहेत. जिल्ह्यात विविध १७ बँका कार्यरत आहेत. यामध्ये रांगा लावून नागरिकांनी पैसे जमा केले आहेत. यामध्ये ५५ लाख ८३ हजार ७० हजार रुपयांच्या नोटा जमा झाल्या आहेत. यातून पाच अब्ज ५८ कोटी ३० लाख ७० हजार रुपये जमा झाल्या आहेत. तसेच पाचशेच्या ६६ लाख २० हजार ७१९ नोटा जमा करण्यात आल्या आहेत.
याच्या माध्यमातून तीन अब्ज ३१ कोटी तीन लाख ५९ हजार ५०० रुपये जमा करण्यात आले आहेत. सद्यस्थितीत अग्रणी बँकेकडून सादर करण्यात आलेल्या अहवालानुसार सध्या नोटा जमा करण्याचा ओघ बऱ्यापैकी मंदावला आहे. बँकांतील रांगा कमी झाल्या आहेत. सध्याच्या या टप्प्यात गरजवंतांनी रकमा जमा केल्या आहेत. काहीजण अद्यापही जुन्या नोटा विविध मार्गांनी कटवण्यासाठी प्रयत्न करत आहेत. नोटा कटल्याच नाहीत तर शेवटी अशा लोक नोटा जमा करण्यासाठी बँकेमध्ये येणार आहेत. मात्र, ते शेवटच्या टप्प्यात येण्याची शक्यता आहे. यामुळे डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात नोटा जमा करण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी होणार आहे.

हैदराबादबँकेत अधिक पैसा : हैदराबादबँकेमध्ये सर्वात अधिक नोटा जमा झाल्या आहेत. येथे ३२ लाख २३ हजार ३७७ हजाराच्या तर ५६ लाख नऊ हजार ८०७ पाचशेच्या नोटा जमा झाल्या आहेत. त्यानंतर एसबीआयने तीन लाख ६८ हजार ५४९ हजाराच्या १४ लाख ८४ हजार ३०० पाचशेच्या नोटा जमा झाल्या आहेत. अॅक्सिस बँकेत तीन लाख ९७ हजार ८४० तर चार लाख ७१ हजार ३९६ पाचशेच्या नोटा जमा झाल्या आहेत. अन्य बँकांमध्ये कमी अधिक याच प्रमाणात नोटा जमा झाल्या आहेत. बँकांतील कर्मचाऱ्यांनी सातत्याने काम करून नोटा संकलित केल्या तसेच नवीन चलनही ग्राहकांना उपलब्ध करून दिले. रात्री उशिरापर्यंत त्यांनी काम केले.
नोटा खपण्याची प्रतीक्षा
काही नागरिक त्यांच्याकडील नोटा खपण्याची प्रतीक्षेत आहेत. यात बेहिशेबी मालमत्ताधारक अधिक आहेत. आडत व्यापाऱ्यांच्या माध्यमातून, बांधकाम मजूर, लहान व्यावसायिक, शेतमजुरांना नोटा खपवण्याचा प्रकार सुरू आहेत.

ग्रामीण भागात दोन अब्ज
ग्रामीण भागातून सुमारे दोन अब्ज रुपयांच्या नोटा जमा झाल्या आहेत. ग्रामीण भागातील प्रमुख बँक असलेली महाराष्ट्र ग्रामीण बँकेने पाच लाख ९४ हजार ५५० हजाराच्या तर २० लाख ५० हजार ५६० पाचशेच्या नोटा संकलित केल्या आहेत. याची एकत्रित रक्कम एक अब्ज ६१ कोटी ९८ लाख ३० हजार रुपये होते. अन्य राष्ट्रीयीकृत बँकांच्या शाखांतून सुमारे ४० कोटी जमा झाले आहेत. असे दोन अब्ज एक कोटी ९८ लाख ३० हजार जमा झाले आहेत.

काही बँकातील नोटांचे विवरण

बँक ५०० १०००
एसबीएसच ५६०९८०७ ३२२३३७७
एसबीआय १४८४३०० ३६८५४९
बीओबी १३६३२७ ४४३०१
बीओआय २५३०६० ११०२८३
एसडीएफसी ४७२५१७ १७४७५१
बीओएम ५२३४९७ २०४२२१
एमजीएम २०५०५६० ५९४५५०
बातम्या आणखी आहेत...