आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • भिकेचे पैसे न दिल्याने कानच कापला!

भिकेचे पैसे न दिल्याने कानच कापला!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - चौका-चौकात भीक मागणार्‍या लहान मुला-मुलींचे वास्तव भीषण आहे. ती गरिबीमुळे नव्हे, तर मजबुरीने, कोणाचे तरी गुलाम म्हणून भीक मागत असल्याचे औरंगाबादेत एका घटनेच्या निमित्ताने उघडकीस आले. भिकारी म्हणून पकडलेल्या आठ व दहा वर्षांच्या दोन मुलींनी, एका जोडप्याने भीक मागण्यास भाग पाडल्याचे सांगून या प्रकाराचा पर्दाफाश केला. भीक आणून दिली नाही म्हणून आपला कान ‘त्या’ महिलेने चक्क कात्रीने कापला, अशी माहिती देत यापैकी एका मुलीने कापलेला कान दाखवला, तेव्हा पोलिसही हेलावून गेले.

साधारण महिनाभरापूर्वी भीक मागणार्‍या मुलांमुळे होणार्‍या त्रासातून सुटका व्हावी यासाठी डॉ. मीनल कुलकर्णी यांनी पोलिसांची मदत मागितली. धावपळ करून अनिता व सुनीता (नावे बदलली आहेत.) या दोन मुलींना एन-3 येथे पकडण्यात आले. त्यांना मुकुंदवाडी पोलिस ठाण्यात नेण्यात आले. दरम्यान, मुलींना सोडवण्यासाठी एक जोडपे धावून आले, तेव्हा हे आपले आई - वडील नसल्याचे मुलींनीच सांगितले. त्यामुळे पोलिसांनी मुलींना बालिकाo्रमात पाठवले.

या मुलींचे पालनकर्ते म्हणविणारे भिकारी दांपत्य मुलींना परत मिळवण्यासाठी बालिका्रमाच्या कर्मचार्‍यांच्या हात धुऊन मागे लागले आहे. त्यासाठी आवश्यक असणारे पुरावेदेखील दांपत्याने आणले होते. मात्र, डॉ. कुलकर्णी आणि बालिकार्शमाच्या कविता वाघ यांनी न्याय्य पद्धतीने जे होईल त्यानुसारच मुलींना ताबा देऊ, अशी भूमिका घेतली आहे.

मुलींना पुन्हा भेटून समाधान
जालना रोडवर या मुलींना आम्ही पकडू शकलो. त्यांनी कित्येक दिवसांपासून अंघोळ केलेली नव्हती. मात्र, जेव्हा त्यांना बालिकार्शमात दिवाळीनिमित्त भेटायला गेले तेव्हा दोघी स्वच्छ, सुंदर दिसत होत्या. आनंदी होत्या. ते पाहून समाधान वाटले. दोन मुलींच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडवून आणल्याचा मला आनंद वाटतो. - डॉ. मीनल कुलकर्णी