आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • माथेफिरूंनी फोडल्या पाच कारच्या काचा

माथेफिरूंनी फोडल्या पाच कारच्या काचा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - खडकेश्वर, नागेश्वरवाडी आणि गारखेडा परिसरात माथेफिरूने पाच कारच्या काचा फोडल्या. या घटना गुरुवारी सकाळी उघडकीस आल्या. यापूर्वी माथेफिरूंनी वाहने जाळण्याचा धडाका लावला होता. मात्र, आता कारच्या काचा फोडत असल्याने नागरिकांमध्ये दहशत निर्माण झाली आहे.

खडकेश्वर येथील डॉ. संजय माणिकराव देशमुख (44, रा. देशमुख वाडा) यांनी त्यांची टाटा नॅनो कार (एमएच 20 बीवाय 7876) घराबाहेर उभी केली होती. त्यांच्याच कारच्या शेजारी बाबासाहेब साहेबराव देशमुख यांची टाटा सुमो (एमएच 20 बीवाय 1979) ही उभी होती. मध्यरात्री आलेल्या माथेफिरूंनी या दोन्ही गाड्यांच्या काचा फोडत पळ काढला. पहाटे साडेपाचच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. तसेच नागेश्वरवाडीतील किराणा दुकानदार राजन दत्तात्रय सूर्यवंशी (46) यांची आल्टो कार (एमएच 20 एजी 1460) बुधवारी मध्यरात्री घरासमोर उभी होती. त्यांच्याही कारच्या काचा अज्ञात माथेफिरूंनी फोडल्या. याप्रकरणी सकाळी सिटी चौक पोलिस ठाण्यात अदखलपात्र स्वरूपाच्या गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे, तर गारखेडा परिसरातील एमराल्ड सिटीजवळ असलेल्या कल्याण अपार्टमेंटमधील दोन टाटा इंडिका आणि एका वॅगन आर कारची काच फोडून माथेफिरूंनी पळ काढला. मात्र, तक्रार न दिल्याने गुन्हा दाखल झाला नसल्याचे जवाहरनगर आणि मुकुंदवाडी पोलिसांनी सांगितले.