आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शहरात पोलिस सतर्क, प्रजासत्ताक दिनी खुला प्रवेश नाही

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- प्रत्येक शहरात स्वातंत्र्यदिन आणि प्रजासत्ताकदिनी होणा-या मुख्य ध्वजारोहण कार्यक्रमाला जास्तीत जास्त नागरिकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन प्रशासनातर्फे केले जाते. मात्र, येथून पुढे ओळख असल्याशिवाय नागरिकांना ध्वजदर्शन घेता येणार नाही.
पाकिस्तानात लष्करी शाळेवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे. अशा सोहळ्याला हजर राहण्यासाठी किमान एक ओळखपत्र तरी आवश्यक ठरणार आहे.
पेशावर येथे लष्कराच्या शाळेवर झालेला दहशतवादी हल्ला, फ्रान्समध्ये चार्ली हेब्दो या साप्ताहिकावरील हल्ला आणि मुंबईसह देशातील प्रमुख शहरांवर अतिरेकी हल्ला करण्याची मिळालेली धमकी या पार्श्वभूमीवर प्रशासनाने वरील निर्णय घेतला आहे. ओळखपत्राची सक्ती चुकीची वाटत असली तरी सुरक्षेसाठी तसे करणे गरजेचे आहे. यामागील कारणे सर्वांनीच समजून घ्यावीत, असे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने खासगीत बोलताना सांगितले.
ओळखपत्र आणावे
सामान्य नागरिकांना प्रजासत्ताकदिनी प्रवेश दिला जाईल. मात्र, प्रत्येकाने आपले छायाचित्र असलेले आेळखपत्र बाळगणे गरजेचे आहे. राष्ट्रीय सुरक्षेचा प्रश्न असल्याने सर्वांनी सहकार्य करावे. राजेंद्रसिंह, पोलिसआयुक्त .