आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आरबीआयने जाणून घेतल्या समस्या

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- रिझर्व्हबँकेच्या (आरबीआय) पाच अधिकाऱ्यांनी शहरातील बँक अधिकारी आणि उद्योजकांची मंगळवारी आढावा बैठक घेतली. उद्योजकांसाठी कोणकोणत्या योजना आहेत, याची माहिती यावेळी देण्यात आली. तसेच त्यांच्यापुढील आव्हाने आणि समस्याही जाणून घेतल्या.

केंद्रात नरेंद्र मोदींचे सरकार आल्यावर मेक इन इंडियाचे वारे जोरात वाहत आहे. त्यात प्रामुख्याने लघु आणि मध्यम उद्योजकांना उद्योग उभारणीसाठी तसेच नवीन उत्पादने निर्मितीसाठी बळ देण्यावर भर देण्याचे धोरण आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही मोदींच्या पावलावर पाऊल टाकत मेक इन महाराष्ट्रची घोषणा केली आहे. सीएमआयए म्हणजे चेंबर ऑफ मराठवाडा इंडस्ट्रीज अँड अॅग्रिकल्चर या उद्योजकांच्या अग्रगण्य संघटनेने तीन ते पाच जुलै कालावधीत औरंगाबाद येथे डेस्टिनेशन मराठवाडा या प्रदर्शनाचे आयोजनही केले होते.

त्यातही छोट्या-मोठ्या उद्योजकांना जागतिक बाजारपेठेतील संधी यावरच लक्ष केंद्रीत करण्यात आले होते. त्यावेळी बहुतांश उद्योजकांनी बँकांकडून मिळणारी मदत, कर्ज पुरवठा आदींबाबत काही महत्वाचे मुद्दे उपस्थित केले होते. त्या अनुषंगाने आरबीआयचे विभागीय संचालक रामास्वामी यांच्या नेतृत्वाखाली पाच अधिकाऱ्यांचे पथक मंगळवारी शहरात आले होते. सकाळी या अधिकाऱ्यांनी वाळूज येथील मराठवाडा ऑटो क्लस्टरला भेट दिली. मराठवाड्यात क्लस्टरचे अत्याधुनिक तंत्रज्ञान पाहून या अधिकाऱ्यांनी समाधान व्यक्त केले, अशी माहिती सूत्रांनी दिली.

कर्ज प्रकरणाविषयी सविस्तर केली चर्चा
त्यानंतरझालेल्या बैठकीस अधिकारी तसेच शहरातली सर्व बँकांचे प्रतिनिधी उपस्थित होते. याबाबत माहिती देताना अग्रणी बँकेचे जिल्हा व्यवस्थापक अनंत घाटे यांनी सांिगतले की, या बैठकीच्या माध्यमातून लघु उद्योजक आणि इतर उद्योजकांसाठी कोणत्या योजना राबवण्यात येतात याची माहिती उद्योजकांना देण्यात आली. तसेच कर्जप्रकरणात नेमक्या काय अडचणी येतात याबाबतदेखील चर्चा करण्यात आली. बैठकीला शहरातील ४२ बँकांचे प्रतिनिधी उपस्थित होते. या बैठकीत उद्योजकांनीदेखील त्यांना कर्ज मिळवण्याच्या बाबतीत येणाऱ्या अडचणी मांडल्याचे सीएमआयचे अध्यक्ष आशिष गर्दे यांनी सांगितले.