आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Electric Committee Representatives Not Turned Meeting

विद्युत समितीच्या बैठकीकडे लोकप्रतिनिधींनी फिरवली पाठ

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- जिल्ह्यात वीज कंपन्यांच्या कामावर देखरेख ठेवून ग्राहकांना समाधानकारक सेवा मिळते आहे की नाही हे पाहण्याची जबाबदारी जिल्हा विद्युत समितीची आहे. परंतु समितीच्या बैठकीबाबत समितीचे पदाधिकारीच अनास्था दाखवत असल्याचे शनिवारच्या बैठकीत दिसून आले.
समितीचे सहअध्यक्ष खासदार रावसाहेब दानवे, जिल्हा परिषद अध्यक्ष श्रीराम महाजन आणि विशेष म्हणजे सदस्य सचिव आणि महावितरणचे मुख्य अभियंता सतीश चव्हाण यांच्यासह बहुतांश लोकप्रतिनिधी बैठकीला गैरहजर होते. जिल्ह्यातील वीज वितरण व्यवस्था खोळंबलेली असताना जनतेच्या या जिव्हाळ्याच्या प्रश्नांवर लोकप्रतिनिधीच गंभीर नसतात याचा प्रत्यय आला.
ग्रामीण भागात वीजविषयक पायाभूत सुविधा निर्माण करण्याकरिता दीनदयाल उपाध्याय ग्राम ज्योती योजना आणि शहरी भागात एकात्मिक ऊर्जा विकास योजना राबवण्यात येत आहे. या योजनांच्या कामकाजावर नियंत्रण ठेवण्याकरिता वेळेत काम पूर्ण करून घेण्यासाठी जिल्हा विद्युत समिती स्थापन करण्यात आलेली आहे. या समितीची पहिली बैठक खासदार चंद्रकांत खैरे यांच्या उपस्थितीत शनिवारी दुपारी पार पडली. बैठकीत दोन्ही योजनांच्या अंतर्गत करण्यात येणाऱ्या विकासकामांवर विस्तृत चर्चा करण्यात आली. त्यानंतर महावितरण, महापारेषण आणि पॉवरग्रीड वीज कंपन्यांच्या अधिकाऱ्यांना कामे वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना समितीने केल्या.
बैठकीला आमदार अतुले सावे, प्रशांत बंब, महापौर त्र्यंबक तुपे, नगरसेवक नंदू घोडेले, आत्माराम पवार, अतिरिक्त जिल्हाधिकारी सोरमारे, महापारेषणचे मुख्य अभियंता जी. टी. मुंडे, जे. सी. दास, पॉवरग्रीडचे प्रबंधक श्रीपाद कोलते, अधीक्षक अभियंता प्रभाकर निर्मळे, अशोक फुलकर, कार्यकारी अभियंता मदन शेळके, अर्शद पठाण, मनपा शहर अभियंता सखाराम पानझडे आदी उपस्थित होते.
योजना नावालाच राहतील

विकासकामे पूर्ण करून घेण्याची जबाबदारी लोकप्रतिनिधींची असते, पण विकासकामांसंदर्भातील बैठकांना तेच अनुपस्थित राहत असतील तर सरकारने कितीही योजना आणल्या तरी त्या नावालाच राहतील.

बैठकीला यांची दांडी
सहअध्यक्षखासदार रावसाहेब दानवे, खासदार राजकुमार धूत, सदस्य विक्रम काळे, सतीश चव्हाण, सुभाष झांबड, अब्दुल सत्तार, संजय शिरसाठ, हर्षवर्धन जाधव, संदिपान भुमरे, सय्यद इम्तियाज जलील, भाऊसाहेब चिकटगावकर, जिल्हा परिषद अध्यक्ष श्रीराम महाजन, सदस्य सचिव मुख्य अभियंता सतीश चव्हाण बैठकीला उपस्थित नव्हते.

वीज वितरण व्यवस्था कोलमडली
आमदारसावे बंब यांनी शहर ग्रामीण भागातील वीज वितरण व्यवस्था पूर्णत: कोलमडली असून ग्राहक हैराण झाल्याचे महावितरण प्रशासनाच्या लक्षात आणून देत अखंडित वीज सेवा देण्याच्या सूचना केल्या. त्यावर इन्फ्रा- ग्राम ज्योती योजनेअंतर्गत सर्व कामे लवकरात लवकर पूर्ण केली जाणार असल्याचे अधीक्षक अभियंता निर्मळे फुलकर यांनी सांगितले.

आज महत्त्वपूर्ण बैठक
रेल्वेस्टेशनरोडवरील विद्युत खांब हटवून वाहिन्या भूमिगत करण्यासाठी रविवारी सुभेदारी विश्रामगृहावर महत्त्वपूर्ण बैठक घेण्यात येणार असल्याचे खैरे यांनी स्पष्ट केले.