आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बचत खाते : अडीच महिन्यांत "जनधन'ची पावणेदोन लाख खाती

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - जनधन योजनेअंतर्गत अवघ्या अडीच महिन्यांत जिल्ह्यात पावणेदोन लाख नागरिकांनी बँकेत खाती उघडली आहेत. २८ ऑगस्टला या योजनेचा शुभारंभ शहरात करण्यात आला होता. त्यानंतर अडीच महिन्यांतच जिल्ह्यात आतापर्यंत एक लाख ७२ हजार खाती उघडण्यात आली असल्याची माहिती जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक आनंद घाटे यांनी िदली आहे.

जनधन योजना सुरू झाल्यानंतर त्याला औरंगाबाद जिल्ह्यात सर्वत्र चांगला प्रतिसाद मिळाला. लोकांनी मोठ्या प्रमाणात रांगा लावत बँकेत खाती उघडली होती. तसेच बँकेच्या वतीनेदेखील वाॅर्डनिहाय त्या भागातल्या नागरिकांसाठी बँकेत खाते उघडण्याचे िनयोजन केले होते.

शहरात ८७ हजार लोकांनी उघडली खाती : औरंगाबाद जिल्ह्यात शहर आणि तालुक्यामध्ये ८७ हजार ५३५ लोकांनी जनधन योजनेअंतर्गत खाती उघडली आहेत. तर ग्रामीण भागातदेखील योजनेला चांगला प्रतिसाद मिळत आहे. जिल्ह्यात आतापर्यंत ग्रामीण भागात ८४४७९ लोकांनी खाती उघडली आहेत. हे खाते झीरो बॅलन्सने उघडले जाते. याबाबत माहिती देताना घाटे यांनी सांगितले, लोकांमध्ये खाते उघडण्यासाठी मोठा उत्साह आहे. त्यामुळेच इतक्या कमी वेळात इतक्या मोठ्या प्रमाणात खाती उघडणे शक्य झाले आहे.
जिल्ह्यात ४१ विविध बँकांच्या मदतीने या योजनेअंतर्गत खाती उघडली जातात. तसेच ग्रामीण भागात खाते उघडण्यासाठी सर्व बँकांच्या वतीने विशेष शिबिरदेखील लावण्यात आल्यामुळे त्याला चांगला प्रतिसाद मिळाल्याचे त्यांनी सांगितले.

एसबीआयमध्ये सर्वाधिक खाती
जिल्ह्यात जनधन योजनेअंतर्गत सर्वाधिक खाती एसबीआय बँकेच्या वतीने उघडण्यात आली आहेत. एसबीआयने ३९,४१५, तर एसबीएचने ३४,९०७, बँक ऑफ महाराष्ट्राच्या वतीने ३१,४४१, सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या वतीने १४,८०६, तर ग्रामीण बँकेच्या वतीने १५,३६२ खाती उघडण्यात आली आहेत. तर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या वतीने ७,३७७ खाती उघडण्यात आली आहेत.