आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

जिल्हा सामान्य रुग्णालयाला 1 कोटी 30 लाखांचा निधी; पालकमंत्र्यांनी दिले जिल्हाधिकाऱ्यांना पत्र

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- बहुप्रतीक्षित जिल्हा सामान्य रुग्णालयाचे काम या ना त्या कारणाने सतत रखडत आहे. एकीकडे रुग्णालय सुरू करण्यासाठी लहानसहान गोष्टींची पूर्तता करताना प्रशासनाची दमछाक होत आहे, तर दुसरीकडे रुग्णालय ३० डिसेंबरपर्यंत कार्यान्वित करा, असा न्यायालयाचा आदेश आहे. यासाठी नेमक्या आवश्यकता काय आहेत, याचा आढावा घेण्यासाठी गुरुवारी पालकमंत्री रामदास कदम यांनी रुग्णालयाला भेट दिली. शस्त्रक्रियागारांतील अत्यावश्यक यंत्रसामग्रीची आवश्यकता असल्याचे लक्षात येताच त्यांनी जिल्हा नियोजन समितीतून नावीन्यपूर्ण योजनेच्या निधीतील कोटी ३० लाख देण्याचे निश्चित केले. याविषयीचे पत्रही त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिल्याचे शिवसेना जिल्हाप्रमुख अंबादास दानवे यांनी सांगितले.


चिकलठाण्यातील जिल्हा सामान्य रुग्णालय २०११ पासून निर्मिती अवस्थेत आहे. निधी रखडल्याने इमारत पूर्ण होण्यास ऑक्टोबर २०१७ उजाडला. येनकेन प्रकारे प्रशासनाने खाटा इतर साहित्याची जुळवाजुळव केली. रुग्णालयात आंतररुग्ण विभाग सुरू करण्यासाठी अत्यावश्यक असलेल्या यंत्रसामग्रीची व्यवस्था अजूनही झालेली नाही. हा आढावा घेऊन कदम यांनी तत्काळ निधी दिला. 


या वेळी त्र्यंबक तुपे, अंबादास दानवे, कृष्णा पाटील डोणगावकर, अप्पर जिल्हाधिकारी पी. एल. सोरमारे, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. व्ही. एस. भटकर, उपविभागीय अधिकारी शशिकांत हदगल, अप्पर तहसीलदार मुंडलोड यांची या वेळी उपस्थिती होती. 


पाण्याची सोय करा 
रुग्णालयातपाण्याखेरीज काम करणे शक्य नाही. त्यामुळे तत्काळ पाणी व्यवस्था द्या, अशा सूचनाही त्यांनी मनपाच्या अधिकाऱ्यांना दिल्या. जिल्हा स्त्री आणि बाल रुग्णालयाच्या आवश्यक जागेसाठीही प्रस्ताव द्या, असेही कदम म्हणाले. 

बातम्या आणखी आहेत...