आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ॲक्टिव्हाच्या डिकीतून एक लाख रुपये लांबवले

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - घरासमोरउभी करून ठेवलेल्या ॲक्टिव्हाच्या डिकीतून चोरट्यांनी एक लाख रुपये लांबवले. ही घटना सोमवारी दुपारी आरिफ कॉलनीत घडली. या प्रकरणी जिन्सी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

झिशान मोहंमद सिद्दिकी यांच्या मित्राला एक लाख रुपये उसने हवे होते म्हणून त्यांनी शहागंज येथील स्टेट बँक ऑफ हैदराबाद बँकेतून एक लाख रुपये काढले. त्यांनी ही रक्कम ॲक्टिव्हाच्या डिक्कीत ठेवली होती. मित्राचा फोन आला म्हणून ते त्याच्याशी बोलत घरात गेले. दरम्यान भामट्याने पैसे पळवले. सिद्दिकी यांनी जिन्सी ठाण्यात तक्रार दिली. तपास पोलिस उपनिरीक्षक भदरगे करत आहेत.
बातम्या आणखी आहेत...