आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जायकवाडी धरणात १०.८५ टक्के साठा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - निळवंडे आणि मुळामधून विसर्ग कमी प्रमाणात होत असल्यामुळे आणखी ते १० दिवस जायकवाडीत पाण्याची आवक सुरू राहणार आहे. जायकवाडी धरणासाठी १२.८४ टीएमसी पाणी सोडण्याचा निर्णय झाल्यानंतर आतापर्यंत १०.१३ टीएमसी पाणी सोडण्यात आले असून त्यापैकी ६.०९ टीएमसी पाणी जायकवाडीत आले आहे. जायकवाडी धरणात २३ दिवसांपासून पाणी सोडण्यात येत आहे. दारणा समूह, गंगापूर समूह, मुळा आणि निळवंडेमधून पाणी सोडण्यात आल्यानंतर जायकवाडीच्या साठ्यात वाढ झाली असून जायकवाडीत सध्या १०.८५ टक्के साठा आहे.

कमी वेगामुळे ४० टक्के वहनव्यय
सध्यानिळवंडे धरणातून २८८८ आणि मुळामधून २०० क्युसेक पाणी सोडण्यात येत आहे. अजून २.७१ टीएमसी पाणी सोडणे बाकी आहे. दररोज साधारण ०.२६ टीएमसी पाणी सोडले जात असल्यामुळे आणखी १० ते १२ दिवस धरणातून पाणी जायकवाडीत सोडावे लागणार आहे. साठा कमी असल्यामुळे स्पीलवेमधून पाणी सोडता आले नाही. त्यामुळे सध्या रिव्हर स्पिर गेटद्वारे पाणी नदीपात्रात सोडण्यात येत आहे. त्यामुळे त्याची मर्यादा कमी असल्यामुळे कमी वेगाने पाणी सोडले जात आहे. त्यामुळे आतापर्यंत ४० टक्के वहनव्यय झाला असून जवळपास आठ टीएमसीपर्यंतच पाणी पोहोचेल, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

साठा १२ टक्क्यांच्या पुढे जाणार
जायकवाडी धरणात पाणी सोडण्यापूर्वी ४.४७ टक्के साठा होता. तो आता १०.८५ टक्क्यांवर पोहोचला आहे. यात उपयुक्त पाणीसाठा २३५ दलघमी आणि एकूण पाणीसाठा ९७३ दलघमी आहे. आवक सुरू असल्यामुळे साठा १२ टक्क्यांच्या पुढे जाण्याची शक्यता आहे. आतापर्यंत दारणा २.२५ टीएमसी, कडवा ०.३८, मुकणे ०.६७ आणि आळंदी ०.०५ असे दारणा समूहातून ३.३५ टीएमसी पाणी सोडण्यात आले आहे, तर गंगापूरमधून १.३६ टीएमसी, मुळामधून १.४४ टीएमसी आणि निळवंडेमधून ४.१९ टीएमसी असे १०.१३ टीएमसी पाणी सोडण्यात आले आहे.