आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • 10 Lakh Quintal Sugar Cane Production In Aurangabad District

औरंगाबाद जिल्ह्यात १० लाख क्विंटल साखरेचे उत्पादन

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
करमाड - तीव्र दुष्काळामुळे यंदा कामगारांसह शेतकरीही प्रथमच ऊस तोडणीसाठी घराबाहेर पडले आहेत. त्यामुळे ऊसतोड जलद गतीने होत असल्याने साखर कारखाने पूर्ण क्षमतेने चालत आहेत.मोठ्या प्रमाणात ऊस गाळपासाठी येत असल्यामुळे साखर कारखान्यांनी ३० डिसेंबरअखेर मागील वर्षीपेक्षा चार लाख क्विंटल साखरेचे जास्तीचे उत्पादन केले.
आतापर्यंत जालना औरंगाबाद जिल्ह्यात अंदाजे १० लाख क्विंटल साखरेचे उत्पादन झाले आहे. सन २०१२-१३ मध्ये दुष्काळात सापडलेल्या शेतकऱ्यांना निसर्गाने २०१३-१४ मध्ये चांगली साथ दिली. जायकवाडी जलाशयातून दोन रोटेशन सोडण्यात आले. तसेच कन्नड तालुक्यातील शिवना-टाकळी अंबाडी धरणही भरले. त्यामुळे कन्नड, अंबड, पैठण, गेवराई या तालुक्यात उसाचे क्षेत्र १५ टक्क्याने वाढले. मात्र, २०१४-१५ हे वर्ष दुष्काळ घेऊनच उजाडले. त्यामुळे जास्तीचा ऊस, कमी पडणारे पाणी दीडपटीने वाढलेला कामगार वर्ग यामुळे ऊस घेऊन येणारे ट्रक लवकर भरण्यात येऊन जलदगतीने कारखान्यावर येऊ लागले. त्यामुळे व्यवस्थापनाला साखर कारखाने पूर्ण क्षमतेने चालवण्याशिवाय गत्यंतर नव्हते. मागील वर्षी ऊस तोडून तो ट्रकमध्ये भरण्यासाठी सहा ते सात कोयते होते.

औरंगाबाद जिल्ह्यात पाचच कारखाने सुरू
औरंगाबादजालना जिल्ह्यांत सहकारी खासगी तत्त्वावरील नोंदणीकृत १६ साखर कारखाने आहेत. औरंगाबाद जिल्ह्यात संत एकनाथ (पैठण), बारामती अॅग्रो (कन्नड), सिद्धेश्वर (सिल्लोड) मुक्तेश्वर (गंगापूर) हे पाचच कारखाने गाळप करताहेत. शरद सहकारी (पैठण), विनायक (वैजापूर), देवगिरी (फुलंब्री) यांनी काही वर्षे गाळप केले, परंतु ते आता बंद आहेत.

एप्रिलपर्यंत चालेल हंगाम : कन्नडचाहिराजीबाबा सहकारी कारखाना आर्थिक सहकार्य मिळाल्याने उभा राहू शकला नाही, तर खुलताबादचा घृष्णेश्वर पूर्णपणे उभा राहूनही त्याचा बॉयलर पेटला नाही. गंगापूर -वैजापूरदरम्यान झांबड परिवाराचा खासगी कारखाना उभारणीच्या स्थितीत आहे. मागील वर्षी २० फेब्रुवारीपासून कारखाने बंद होण्यास प्रारंभ झाला. या वर्षी गाळपाचा हंगाम मार्च-एप्रिलपर्यंत चालेल असा अंदाज आहे.