आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रेयसीला "इम्प्रेस' करण्यासाठी पाच महिन्यांत चोरल्या १० गाड्या

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - प्रेयसीला इम्प्रेस करण्यासाठी त्याने पाच महिन्यांत दहा मोटारसायकली चोरल्या. पण शेवटी हे चौर्यकर्म त्याला बाराच्या भावात पडले. या मजनूसह त्याला वाहन विकून देणाराही पोलिसांच्या जाळ्यात अडकला. शेख मजिद शेख मोहंमद (२०, रा. हर्सूल) असे या चोरट्याचे नाव असून सय्यद कैसर सय्यद अहमद (२५, रा. हर्सूल सावंगी) हा त्याला गाड्या विकण्यात मदत करीत होता. दोघांना जिन्सी पोलिसांनी शुक्रवारी रात्री अटक केली.

जिन्सी ठाण्याच्या हद्दीत शुक्रवारी रात्री मजिद आणि सय्यद हा (एमएच २१ एआर) ही हीरो होंडा कंपनीची दुचाकी विकत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिस निरीक्षक शिवाजी कांबळे, उपनिरीक्षक अमितकुमार बागुल यांनी सापळा लावून मजिद, कैसर यांना अटक केली. त्यांची चौकशी केली असता मागील पाच महिन्यांत मजिदने दोन सीबीझेड, दोन पॅशन, चार स्प्लंेडर, एक शाइन आणि एक प्लेझर गाड्या चोरल्याची कबुली दिली. त्यातील नऊ गाड्या जप्त करण्यात आल्या आहेत. या कारवाईत हेड कॉन्स्टेबल दिनेश बन, मीर आरेफअली, सुभाष शेवाळे, इरफान खान, अशरफ सय्यद, संदीप तायडे, संजय नंद यांनी ही कारवाई केली.
पुढील स्‍लाइडवर वाचा, कशी चोरायचा आणि कुठे विकायचा गाडी