आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दहावीतील मुलाचा मारहाणीने मृत्यू, सीसीटीव्हीमुळे प्रकार झाला उघड

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
खुलताबाद - शूलिभंजन परिसरातील अलइरा एज्युकेशन संस्थेच्या अल-इरफान निवासी शाळेत मंगळवारी दहावीतील मुलाचा संशयास्पद मृत्यू झाला होता. मृत मुलाच्या पालकांनी दिलेल्या तक्रारीवरून मृत्यूस कारणीभूत तसेच मारहाण करणाऱ्या अल्पवयीन विद्यार्थ्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून शाळा प्रशासन या प्रकरणामुळे अडचणी सापडले आहे. सीसीटीव्हीमुळे हा प्रकार उघडकीस आला आहे.

ठाणे जिल्ह्यातील राबोडी येथील शिवाजीनगरात राहणारा शेख अफरोज शेख अमीन (वय १६) हा शूलिभंजन परिसरातील अल-इरफान निवासी शाळेत दहावीत शिक्षण घेत होता. १२ जानेवारी रोजी दुपारी ४ वाजता अफरोजचा शाळेत संशयास्पद मृत्यू झाला. त्याचा मृतदेह खुलताबादेतील रुग्णालयात उत्तरीय तपासणीसाठी ठेवला होता. अफरोजच्या पालकासह नातेवाईकांना अफरोजच्या मृत्यूविषयी संशय आल्याने त्यांनी शाळेतील सीसीटीव्ही कॅमेरे तपासले. त्यात अफरोजसोबत शिकणारा किनवट येथील विद्यार्थी अफरोजसोबत वाद घालत असल्याचे दिसून आले व नंतर मारहाण केली. त्या वेळी वर्गात कोणीही शिक्षक नव्हते, ही बाब सीसीटीव्ही कॅमेऱ्यात उघड झाली.

मृतदेह घेणार नाही
याला शाळा व्यवस्थापन जबाबदार असून व्यवस्थापन व त्या मुलावर गुन्हा दाखल होइपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही, अशी भूमिका पालकांनी घेतली होती.

शाळेचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर
दहावी शिक्षण घेणाऱ्या अफरोजचा शाळेचा हलगर्जीपणा चव्हाट्यावर आला आहे. या निवासी शाळेत अफगाणिस्तान येथील अनेक मुले शिक्षण घेत आहे. सर्वच बाबतीत जबाबदारी शाळा प्रशासनाची आहे. वर्ग सुरू असताना शिक्षकांनी वर्गात राहणे अनिवार्य असताना शिक्षक हजर नव्हते. हा व्यवस्थापनाचा हलगर्जीपणा आहे.
बातम्या आणखी आहेत...