आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • 10 Thousand Homes Of Mhada In Aurangabad Department

आैरंगाबाद विभागात म्हाडाची १० हजार घरे, अत्यल्प उत्पन्न गटाला परवडणारी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आैरंगाबाद - सर्वसामान्यांना परवडणा-या किमतीत शहरात घरे उपलब्ध करून देण्यासाठी केंद्राने राज्यासाठी आगामी पाच वर्षांत उद्दिष्ट निर्धारित केले आहे. राज्यात घरे बांधणीची जबाबदारी म्हाडावर टाकण्यात आली असून म्हाडाच्या औरंगाबाद मंडळास आगामी पाच वर्षांत अल्प व अत्यल्प, मध्यम व उच्च उत्पन्न गटातील लाेकांसाठी १०,१९० घरे बांधण्यात येणार आहेत.
पहिल्या टप्प्याच्या कामाचे नियोजनही आैरंगाबाद मंडळाने केले आहे. वर्ष २०१५-२०१६ साठी म्हाडाने ४९० युनिटच्या बांधकामाचे नियोजन केले आहे. यात अल्प, अत्यल्प, मध्यम व उच्च उत्पन्न गटासाठी घरे बांधली जातील.

पहिल्या टप्प्यातील घरे : पहिल्या टप्प्यात आैरंगाबाद मंडळाने तीन जिल्ह्यांमध्ये ३१७ घरे व १७३ भूखंड बांधण्याचे निश्चित केले आहे.

१) जालना येथे गट नं. ४८८ मध्ये अत्यल्प उगटासाठी ९० तर अल्प उत्पन्न गटासाठी १६० घरे निश्चित केली आहेत. चालू वर्षी अत्यल्प उत्पन्न गटासाठी ४५ तर अल्प उत्पन्न गटासाठी ८० घरांची निर्मिती केली जाईल.
२)अंबाजोगाई येथे गट. नं. १७ मध्ये अल्प उत्पन्न गटासाठी एकूण २५२ तर अत्यल्पसाठी १३२ घरे बांधली जातील. या वर्षी अल्पसाठी १२६ तर अत्यल्पसाठी ६६ घरे बांधली जातील.
३)मंठा (जि. जालना) येथे चालू वर्षात मध्यम उत्पन्न गटासाठी ७२ भूखंड तर उच्च उत्पन्न गटासाठी ५ भूखंड निश्चित केले आहेत. दोन भूखंड सुविधा भूखंड म्हणून वाटप केले जातील.
४) नर्सी (ता. नायगाव, जि. नाांदेड) येथे मध्यम उत्पन्न गटासाठी २६ तर उच्च उत्पन्न गटासाठी ६ घरांची निर्मिती केली जाईल.

कोट: तांत्रिक व प्रशासकीय मान्यता
या घर बांधणीसाठी चालू वर्षासाठी तांत्रिक व प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. प्रकल्पाचे आराखडे संबंधित भूमी अभिलेख कार्यालयाकडे मंजुरीसाठी पाठवण्यात आले आहेत.
- अनिल रामोड, मुख्याधिकारी, आैरंगाबाद गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळ.
समिती करेल जमिनीची निवड
गृहनिर्माणासाठी म्हाडाची तांत्रिक समिती जमिनीची निवड करेल. मुबलक पाण्याची व्यवस्था असलेल्या जागेस प्राधान्य राहील. शक्य तेथे शासकीय जमिनीला प्राधान्य दिले जाईल. या जमिनीची मोजणी भूमी अभिलेखकडून केल्यानंतर आराखडे मुंबईला पाठवले जातील. मंजुरीनंतर निविदा मागवण्यात येतील. घरांच्या निविदा अंतिम झाल्यानंतर जाहिरातीद्वारे अर्ज मागवले जातील व सोडत पद्धतीने घरे अथवा प्लॉटची विक्री केली जाईल.