आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पत्नीला जाळून मारले; 10 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - क्षुल्लक कारणावरून पत्नीस रॉकेल टाकून जाळल्याप्रकरणी आरोपी विजय पाटील यास जिल्हा सत्र न्यायालयाचे न्यायमूर्ती आर. आर. काकाणी यांनी १० वर्षांची सक्तमजुरी आणि हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. मनीषा विजय पाटील असे मृत महिलेचे नाव आहे.
 
मनीषा आणि विजय हे सहकुटुंब बजाजनगरात राहत होते. विजय एका कंपनीत कामाला होता. घटनेच्या दिवशी २३ नोव्हेंबर २०१२ रोजी विजयने सकाळी १० वाजताच दारू पिण्यास सुरुवात केली. यावर पत्नी मनीषाने रागात येऊन, तुम्हाला दारू पिण्यासाठी पैसे आहेत, माझ्या भावाचे घेतलेले पैसे देण्यासाठी नाहीत का, असा प्रश्न केला. यावर त्याने मनीषाला बेदम मारहाण केली. तिने आरडाओरड सुरू केली असता घराचे दार बंद करून तिच्यावर रॉकेल टाकून पेटवून दिले. नागरिकांनी आग विझवून तिला घाटीत दाखल केले होते. मृत्युपूर्व जबाबात तिने आरोपीविरुद्ध तक्रार दाखल केली होती.
बातम्या आणखी आहेत...