आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

6 जणांची 10 वर्षे सक्तमजुरी औरंगाबाद खंडपीठात कायम; दोन मुलींवर केला होता अत्याचार

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- परभणी येथे नोकरीच्या शोधार्थ आलेल्या दोन अल्पवयीन मुलींवर अत्याचार प्रकरणातील आरोपीना परभणी जिल्हा व सत्र न्यायालयाने सुनावलेली शिक्षा मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्या. टी. व्ही. नलावडे आणि न्या. एस. एम. गव्हाणे यांनी कायम केली. १९९४ मध्ये घडलेल्या या प्रकरणातील शिक्षा झालेल्या दहा जणांपैकी चार जणांचे प्रकरण न्यायप्रविष्ट असताना निधन झाले. 


राज्यभर गाजलेले हे प्रकरण १९९४ मध्ये घडले होते. परभणी येथे नोकरीच्या शोधासाठी आलेल्या दोन अल्पवयीन मुलींना ४ जुलै १९९४ ते ६ जुलै १९९४ हे तीन दिवस शहरातील विविध भागांत नेऊन त्यांच्यावर अत्याचार करण्यात आले होते. रेल्वे स्थानकावरून सदरील दोन्ही मुलींना उचलून त्यांच्यावरविसावा लॉज, शांतीनिकेतन स्कूल, केळीचा मळाआदी ठिकाणी अत्याचार करण्यात आले होते. या प्रकरणी तक्रार दाखल झाल्यानंतर एकंदर सोळा आरोपीना अटक करून त्यांच्याविरुद्ध न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले. दोन प्रकारणांपैकी एका प्रकरणात नऊपैकी सहा आरोपीना भादंवि कलाम ३७६ (२)(जी) अन्वये दहा वर्षे सक्तमजुरी तसेच कलम ३६४ अन्वये एक वर्ष सक्तमजुरीची शिक्षा ठोठावण्यात आली. दुसऱ्या प्रकरणातील सातपैकी चार आरोपीना वरीलप्रमाणेच शिक्षा ठोठावण्यात आली होती. 


या शिक्षेविरुद्ध सर्व आरोपींनी खंडपीठात अपील दाखल केले. शासनाच्या वतीनेही आरोपींच्या शिक्षेत वाढ करण्यात यावी, अशी विनंती करणारे अपील दाखल करण्यात आले. आपिल प्रलंबित असताना शिक्षा झालेल्या आरोपींपैकी सूर्यकांत ढगे, अरुण मापारी, सुरेश कोपरे आणि नितीन दुधगावकर यांचे निधन झाले. या प्रकरणी सुनावणीअंती खंडपीठाने आरोपींचे तसेच शासनाचेही अपील फेटाळून लावले. यात ज्ञानेश्वर कानडे, कल्याण बन्सीधर रेंगे, भानसिंग बुंदेले, राजू महाले, मुन्ना परिहार, महेश मोताफळे या सहा आरोपींची शिक्षा कायम करण्यात आली. 
या प्रकरणी शासनाच्या वतीने अॅड. सचिन सलगरे यांनी काम पहिले. दरम्यान, कल्याण रेंगे शिवसेना नेते असून माजी आमदार मीरा रेंगे यांचे पती आहेत. मीरा रेंगे २००९ मध्ये आमदार म्हणून निवडून आल्या तर २०१४ मध्ये त्यांचा पराभव झाला.

बातम्या आणखी आहेत...