आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महिनाभरात शंभर कोटींच्या कार विक्री! हजार चार चाकी अन् १२ हजार विक्री

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - यंदा झालेल्या समाधानकारक पावसामुळे बाजारातील मंदीचे सावट नाहीसे झाले असून दुष्काळजन्य परिस्थितीत दिवाळी, दसऱ्याला शहरात कारची विक्री ५०० ते ६०० होती, ती केवळ एका महिन्यात चारपटींनी वाढली आहे. ऑक्टोबर महिन्यात दोन हजार कारच्या विक्रीने शंभर कोटींची विक्रमी उलाढाल झाली आहे. शहरातील ऑथराइज्ड ऑटो डीलर संघटनेच्या अहवालानुसार ही आकडेवारी समोर आली आहे. गेल्या तीन वर्षांत प्रथमच एका महिन्यात दोन हजार कारची विक्री झाल्याने बाजारात उत्साहाचे वातावरण पसरले आहे.
{छोट्या अन् मोठ्या कारची विक्री सारखीच सुरू आहे. बेसिक ते लक्झरी मॉडेलला समान पसंती आहे.
{एसयूव्हीहीस्पर्धेत मागे नाही असे कार वितरकांचे मत आहे. दसरा ते दिवाळीच्या १५ दिवसांत मोठी विक्री झाली.
{ऑक्टोबरमहिना अजून संपायचा आहे. हा आकडा पाडव्यापर्यंत २२०० पर्यंत जाईल असा अंदाज वितरकांचा आहे.
{कारसह दुचाकी विक्रीतही विक्रमी वाढ झाली. २८ ऑक्टोबरपर्यंत शहरात १२ हजार दुचाकी विकल्या गेल्या. हा आकडा दोन दिवसांत १५ हजारांपर्यंत जाण्याची शक्यता आहे.

पावसाने मंदी हटवली...
यंदा पाऊसचांगला झाल्याने पैसा बाजारात आला. या पूर्वी सतत वर्षे दुष्काळ असल्याने बाजारात पैसा असूनही लोक वाहन खरेदी टाळत होते.आता पाऊस समाधानकारक झाल्याने वाहन विक्री वाढली. -मनीष धूत, अध्यक्ष, ऑथराइज्ड ऑटो डीलर असोसिएशन.
बातम्या आणखी आहेत...