आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विद्यार्थ्यांच्या आक्रमक आंदोलनामुळे १०० पटींनी वाढवलेले शुल्क रद्द

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
विद्यार्थ्यांच्या विविध संघटनांनी आपल्या मागण्यांसाठी गुरुवारी एकत्रितपणे मोर्चाद्वारे शक्तिप्रदर्शन केले. छाया : माजिद खान - Divya Marathi
विद्यार्थ्यांच्या विविध संघटनांनी आपल्या मागण्यांसाठी गुरुवारी एकत्रितपणे मोर्चाद्वारे शक्तिप्रदर्शन केले. छाया : माजिद खान
औरंगाबाद-विद्यार्थी संघटनांच्या आक्रमक पवित्र्यामुळे डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाशी संलग्नित महाविद्यालयांच्या पदव्युत्तर अभ्यासक्रमांचे (पीजी कोर्सेस) शंभरपटींनी वाढवलेले शिक्षण शुल्क गुरुवारी (९ जुलै) रद्द करण्यात आले. विद्यार्थ्यांच्या आंदोलनापुढे नमते घेत व्यवस्थापन परिषदेने हा निर्णय घेतला.
शुल्क निश्चितीकरण समितीचे प्रमुख तथा एमसी मेंबर डॉ. दत्तात्रय आघाव यांच्यासह सर्व व्यवस्थापन परिषदेचे सदस्य राष्ट्रवादीचे पदवीधर आमदार सतीश चव्हाण यांचे कट्टर समर्थक आहेत. तरीही राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसला आंदोलनाची गरज भासल्याने विद्यापीठ वर्तुळात आश्चर्य व्यक्त झाले. शुल्कवाढीचा निर्णय फिरवल्याचे श्रेय स्वत:कडे घेण्यासाठी चव्हाण यांनी सकाळी विद्यापीठात येऊन कुलगुरूंना निवेदन दिले. याबद्दल चर्चा सुरू होती.
संलग्नित महाविद्यालयांसह विद्यापीठातील काही पीजी कोर्सेससाठी शैक्षणिक सत्र २०१५-१६ दरम्यान शुल्कवाढ करण्याचा निर्णय विद्यापीठाने घेतला होता. त्यासाठी डॉ. आघाव यांची समिती नेमली होती. या समितीने शुल्क शंभरपटींनी वाढवण्याची शिफारस केली होती. विद्यापीठ विद्यार्थिकेंद्रित असल्याचा दावा करणाऱ्या कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे यांनी या शिफारशी कुठलाही विरोध करता मार्च २०१५ च्या व्यवस्थापन परिषदेत मंजूर करून टाकले. एम. ए. आणि एम. कॉमसाठी ३८११ रुपयांचे शुल्क एकदम ११, ८११ रुपये केले. सर्व प्रकारच्या
श्रेय लाटण्याला विरोध
डॉ.मदन यांनी शुल्कवाढ मागे घेण्यासाठी राष्ट्रवादीचे आमदार सतीश चव्हाण यांचे मोठे योगदान असल्याचे जाहीर करण्याचा प्रयत्न केला. मात्र, विद्यार्थ्यांनी त्यांचा प्रयत्न अक्षरश: हाणून पाडला. कुलगुरूंनाच औपचारिक घोषणा करू द्या, तुम्ही मध्ये बोलू नका, असा इशारेवजा टीकेचा सूर लावत विद्यार्थ्यांनी डॉ. मदन यांच्यासह व्यवस्थापन परिषदेच्या सर्व सदस्यांच्या विरोधात संताप व्यक्त केला. आंदोलनाचे नेतृत्व एआयएसएफचे अॅड. अभय टाकसाळ, एसएफआयचे प्रदेशाध्यक्ष मोहन जाधव, डॉ. उमाकांत राठोड, सुनील राठोड, सागर बोहरा, पंकज चव्हाण, पंकज तांदळे, रोहिदास जाधव, रवी शिंदे आदींनी केले.

विद्यार्थी संघटनांची एकजूट
व्यवस्थापनपरिषदेच्या एकाही सदस्याने या ठरावाला विरोध केला नाही. विद्यापीठात ‘न भूतो भविष्यति’ शुल्कवाढीचे महाभारत घडताना कुलगुरू डॉ. चोपडे यांनी कोणतीही भूमिका घेतली नाही. शिक्षणाच्या व्यापारीकरणाचा हा डाव उधळण्यासाठी विद्यार्थी संघटना आक्रमक झाल्या. प्रवेश प्रक्रिया सुरू असताना गुरुवारी दुपारी अनेक वर्षांनंतर सर्व विचारधारांच्या विद्यार्थी संघटनांनी एकत्र येऊन आंदोलन केले. त्यात प्रामुख्याने ऑल इंडिया स्टुडंट्स फेडरेशन, स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडिया, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस, भारतीय विद्यार्थी सेना, वीर भगतसिंग विद्यार्थी परिषद, युवक क्रांती दल, विद्यापीठ कृती समितीच्या कार्यकर्त्यांचा समावेश होता.अधिसभा सदस्य पंडित तुपे आणि अॅड. सुभाष राऊत यांनी बीड येथून वाहनाने आणलेल्या विद्यार्थ्यांचा प्रशासकीय इमारतीवर मोर्चा काढला. एआयएसएफ, एसएफआय आदी संघटनांनी दुपारी बारा ते दीडपर्यंत घोषणांनी परिसर दाणाणून सोडला होता.

अन कुलगुरूंनी दिली गोड बातमी
व्यवस्थापनपरिषदेची बैठक सोडून कुलगुरू आणि डॉ. शिवाजी मदन यांच्यासह काही सदस्य ‘पोर्च’मध्ये येऊन विद्यार्थी आंदोलनाला सामोरे गेले. त्या वेळी विद्यार्थी आक्रमक होऊन घोषणाबाजी करत होते. कुलगुरूंनी शांत होण्याचे आवाहन करत एक गोड आणि आनंदाची बातमी असल्याचे विद्यार्थ्यांना सांगितले. पीजी कोर्सेसची शुल्कवाढ मागे घेतल्याचे त्यांनी जाहीर केले. विद्यार्थ्यांनी ढोल-ताशांच्या गजरात नृत्य करत आणि फटाक्यांच्या आतषबाजीत त्यांच्या घोषणेचे स्वागत केले.
विद्यार्थ्यांच्या विविध संघटनांनी आपल्या मागण्यांसाठी गुरुवारी एकत्रितपणे मोर्चाद्वारे शक्तिप्रदर्शन केले. छाया : माजिद खान
बातम्या आणखी आहेत...