आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

इंधन डेपोसाठी शंभर एकर जागा; पेट्रोलियममंत्री मोईलींचे आश्वासन

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- मराठवाड्यासाठी स्वतंत्र इंधन डेपोची मागणी मान्य झाली असून औरंगाबादमध्ये 100 एकर जागा राखीव ठेवण्यात येईल. तशी सूचना मुख्यमंत्र्यांना केली जाईल, असे आश्वासन पेट्रोलियममंत्री वीरप्पा मोईली यांनी मंगळवारी मसुरीतील बैठकीत दिले. राज्याचे प्रतिनिधित्व खासदार चंद्रकांत खैरे यांनी केले. पानेवाडीतून इंधन पुरवठ्यात अडचणी येत असून दिल्ली-मुंबई कॉरिडॉरचे काम सुरू होण्यापूर्वी हा स्वतंत्र डेपो होणे महत्त्वाचे आहे. बैठकीला विविध राज्यांचे 16 खासदार, पेट्रोलियम कंपन्यांचे अधिकारी व पीएमओतील सचिवांची उपस्थिती होती. या संदर्भात पंतप्रधान कार्यालय राज्याच्या सचिवालयाला सूचना देईल. नंतरच प्रक्रिया सुरू होईल.

साडेचार तास चाललेल्या या बैठकीत विविध राज्यांतील इंधन पुरवठ्याबाबत चर्चा करण्यात आली. मराठवाड्याच्या प्रकल्पाबाबत पंतप्रधान कार्यालयातून राज्याच्या सचिवालयाला सूचना देण्यात येणार असल्याचे खैरे यांनी सांगितले. यानंतर डेपोच्या कामाला प्रत्यक्ष सुरुवात होईल. हिंदुस्थान पेट्रोलियम आणि इंडियन ऑइल या कंपनीने डेपोसाठी जागा मागितली आहे.