आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पैठण तालुक्यात टँकरची शंभरी, गळतीमुळे लाखो लिटर पाण्याचा अपव्यय

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पैठण - धरण उशाशी, तरीही टँकरने पाणी, अशी ओळख आता पैठणची झाली आहे. सलग तिस-या वर्षीदेखील टँकरने शंभरचा आकडा गाठला अाहे. औरंगाबाद महापालिकेच्या पाॅइंटवरून पाणी भरण्यासाठी प्रति टँकर ५२८ रुपये शासनाला मोजावे लागत असून महिन्याकाठी टँकर भरण्याचा खर्च कोटीच्या घरात गेला असला तरी पैठणवासीयांची तहान भागत नाही.
पैठणमध्ये भर पावसाळ्यात टँकरची मागणी होती व पावसाळ्यातच टँकर सुरू झाले. तो आकडा आता शंभरावर गेला आहे. या शंभर टँकरद्वारे तालुक्यातील ७८ गावे व १९८ खेपांद्वारे पाणीपुरवठा गावपातळीवर रोज होत आहे.
पैठण तालुक्यातील अनेक गावांमध्ये दरवर्षी तीव्र पाणीटंचाई निर्माण होते. त्याचा विचार करून अनेक गावांत भारत निर्माण योजनेमार्फत कोटीचे खर्च करून आपले पाणी योजना राबवण्यात आल्या. त्यापैकी २० पेक्षा अधिक गावांत या योजनांचा पूर्णपणे बाेजवारा उडाला आहे, तर काही गावांतील विहिरी कोरड्या पडल्याने त्या गावांत पाण्याचे टँकर सुरू करणे क्रमप्राप्त असले तरी या टंचाईग्रस्त गावांना कायमस्वरूपी पाण्याची उपलब्धता नसल्याने ७८ गावांना टँकरने पाणी देऊनही तहान भागत नसल्याचे चित्र दिसत आहे.
पाणी विकतचे, गळतीत जाते वाया
आजघडीला महानगरपालिकेच्या समांतर जलवाहिनीचे खासगीकरण झाल्याने पाणीदेखील विकत घ्यावे लागते. यामध्ये प्रति टँकरसाठी ५२८ रुपये शासनाला द्यावे लागतात. त्याचा विचार केला असता रोज एका टँकरवर कमी-अधिक अंतराप्रमाणे भरते तरी ४ हजारांच्या वर खर्च होतो. खर्च पाहता टँकरच्या गळतीबरोबरच टँकर पूर्ण भरले की नाही हे पाहणे गरजेचे आहे.
या गावांत सुरू आहेत पाण्याचे टँकर
थेरगाव, दादेगाव, हर्षी, सोनवाडी, खेर्डा, मुरमा, पुसेगाव, बालानगर, पाचोड, वरुडी, ढाकेफळ, कुतुबखेडा, नांदर, मुधलवाडी, वडाळा, तुपेवाडी, कारकीन, दरेगाव, चिंचाळा, बंगला तांडा, एकतुनी, डेरा, चितेगाव, पांगरा, रांजणी, खंडाळा, कडेठाण, पोरगावसह एकूण ७८ गावांत टँकरने सुरू आहे.