आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दहावीची पुरवणी परीक्षा २१ जुलैपासून होणार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- दहावीच्या नापास विद्यार्थ्यांसाठी येत्या २१ जुलैपासून परीक्षेस प्रारंभ होणार आहे. वर्ष वाया जाऊ नये म्हणून ही परीक्षा घेण्यात येत आहे. लेखी परीक्षा २१ जुलै ते ५ ऑगस्ट या काळात होईल.

विज्ञान व तंत्रज्ञानाची प्रात्यक्षिक परीक्षा तसेच श्रेणी, तोंडी परीक्षा व पूर्व व्यावसायिक परीक्षा १४ ते २० जुलै काळात आहे. आऊट ऑफ टर्न परीक्षा ६ ऑगस्टला होईल, मंडळाचे विभागीय अध्यक्ष सुखदेव डेरे यांनी ही माहिती दिली. औरंगाबाद विभागात ६० केंद्रांवर २१ हजार परीक्षार्थी असतील.