आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दहावीत मिळवले 92 टक्के गुण मात्र, यश पाहायला ‘तो’ जगातच नाही!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - आयुष्याचा टर्निंग पॉइंट असलेल्या दहावीसाठी त्याने वर्षभर मेहनत घेतली. त्याचे फळ म्हणून त्याला 92 टक्के गुण मिळाले. पण हे यश पाहण्यासाठी तो स्वत:च या जगात नव्हता. ही दुर्दैवी गाथा आहे आकाश पाटणी याची.

मोहनलालनगरच्या मनोजकुमार पाटणींचा मुलगा आकाश अभ्यासाच सुरुवातीपासूनच हुशार होता. त्याला अभियांत्रिकीमध्ये करिअर करायचे होते. त्यासाठी झपाटून अभ्यास केला आणि अतिशय चांगले पेपर सोडवले. आता प्रतीक्षा होती निकालाची.

पण त्याने यश पहावे हे नियतिला मान्य नव्हते. 19 एप्रिल रोजी घरालगतच्या सार्वजनिक विहिरीतून निघालेला एक पाइप जोडताना आकाशला विजेचा धक्का बसला. त्यातच त्याचे निधन झाले. शोकाकूल कुटुंबाला सावरण्यासाठी त्याच्या काकांनी निकाल पाहिला. त्याने 92 टक्के गुण मिळवले होते. त्याचे यश पाहून सर्वांनाच अभिमान वाटला. मात्र हे यश पहायला तो नसल्याने सारचे हळहळले.