आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दहावी पुरवणी परीक्षेचे वेळापत्रक जाहीर, 18 जुलैपासून लेखी परीक्षेला सुरुवात

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फाईल) - Divya Marathi
(फाईल)
औरंगाबाद - महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे जुलै- ऑगस्ट २०१७ मध्ये घेण्यात येणाऱ्या माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (दहावी) पुरवणी परीक्षेचे अंतिम वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे, अशी माहिती मंडळा्दवारे देण्यात आली आहे.
 
 
पुरवणी परीक्षेचे वेळापत्रक मंडळाचे अधिकृत www.mahahsscboard.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आले आहे. सर्वसाधारण विषयाची लेखी परीक्षा १८ जुलै ते २ ऑगस्ट २०१७ दरम्यान तर व्यवसाय अभ्यासक्रमाची लेखी परीक्षा ११ जुलै ते २५ जुलै दरम्यान घेण्यात येईल. प्रात्यक्षिक, तोंडी, श्रेणी परीक्षा १० जुलै ते १७ जुलै दरम्यान होईल.
 
शरीरशास्त्र , आरोग्यशास्त्र व गृहशास्त्र विषयाची लेखी व प्रात्यक्षिकपरीक्षा १७ जुलै रोजी घेण्यात येईल. आऊट ऑफ टर्न परीक्षा म्हणजेच अपरिहार्य कारणास्तव प्रात्यक्षिक, तोंडी, श्रेणी परीक्षा विद्यार्थी देऊ न शकल्यास त्याला ती परीक्षा ३ ऑगस्ट रोजी देता येईल.
 
मंडळाच्या संकेतस्थळावरील वेळापत्रकाची सुविधा ही फक्त माहितीसाठी आहे. विभागीय मंडळाव्दारे शाळांमध्ये अधिकृत वेळापत्रक देण्यात आले आहे. त्यावरूनच विद्यार्थ्यांनी खात्री करून घ्यावी. खाजगी क्‍लासेस किंवा अन्य यंत्रणेने, अन्य संकेतस्थळारील, जाहिरातीसाठी वितरित केलेल्या वेळापत्रकावर विद्यार्थ्यांनी अवलंबून राहू नये, असे अवाहन मंडळाकडून करण्यात आले आहे.
 
बातम्या आणखी आहेत...