आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आत्महत्येस प्रवृत्त करणार्‍या 11 जणांविरुद्ध गुन्हा दाखल

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - सासरच्या जाचाला कंटाळून मुलीने आत्महत्या केल्याची तक्रार मुलीचे पिता प्रल्हाद पाटील यांनी केली असून 11 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 28 ऑक्टोबर 2012 रोजी मीनल प्रशांत पाटील (सिडको एन-5) यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली होती. सहा महिन्यानंतर रविवारी (17 मार्च) गुन्हा दाखल झाला.

वोक्हार्ट कंपनीतील व्यवस्थापक प्रशांत पाटील यांच्या पत्नी मीनल यांनी बेडरूममधील पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या केली होती. मीनल यांचा पाच वर्षांचा मुलगा आहे. तो मीनलच्या आई- वडिलाकडे राहतो. प्रशांतने मीनलला माहेरून तीन लाख रुपये आण, असा लकडा लावला होता. तिने नकार दिल्यामुळे तिचा छळ सुरू केला, असे या तक्रारीत म्हटले आहे. प्रशांत पाटील, सासरा जिजाबाराव पाटील, सासू सुमनबाई पाटील, नंदोई राजेंद्र चव्हाण, नणंद संध्या पाटील, संजय पाटील, सोनल पाटील, पीतांबर पाटील, दिलीप पाटील, भारती पाटील यांची तक्रारीत नावे आहेत. याप्रकरणी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद झाला असून पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक एन. एस. गंधारे करत आहेत.