आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाच जणांच्या कुंटुंबाचे वर्षाला वाचतील ११ हजार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- दुष्काळकर्जाच्या बजबजपुरीत अडकल्याने आत्महत्येच्या मार्गाकडे वळू लागलेल्या शेतकऱ्यांना राज्य सरकारने अन्नसुरक्षा योजनेचे कवच दिल्यामुळे वर्षाकाठी एका शेतकरी कुटुंबाची अन्नधान्य खरेदीत १०, ९५० रुपयांची बचत होणार आहे.

अन्नसुरक्षा योजनेच्या कवचामुळे शेतकऱ्यांच्या वार्षिक अर्थकारणावर नेमका काय परिणाम होणार याचा शोध ‘दिव्य मराठी’ने घेतला असता ही बाब समोर आली आहे. या अध्ययनासाठी औरंगाबाद जिल्ह्यातील काही शेतकऱ्यांशी संपर्क साधण्यात आला. तेव्हा पाच जणांचे कुटुंब असलेल्या शेतकऱ्यांचे वर्षाकाठी १०,९५० हजार रुपये वाचणार असल्याचे स्पष्ट झाले. ग्रामीण भागात तांदूळ खात नाहीत, हा समज चुकीचा असल्याचेही या अध्ययनातून स्पष्ट झाले आहे.
सिल्लोड येथील शेतकरी एकनाथ शिंदे यांच्या कुटुंबात पाच सदस्य आहेत. हे कुटुंब आतापर्यंत अन्न सुरक्षा योजनेत नव्हते. आता या कुटुंबाला अन्नसुरक्षेचा लाभ मिळणार आहे. शिंदेंच्या
कुटुंबालावर्षाला किमान तीन क्विंटल गहू लागताे. हा गहू ते आठवडी बाजार किंवा किरकोळ किराणा दुकानातून खरेदी करतात. सध्या गव्हाची किमत अडीच हजार रुपये क्विंटल आहे. अशा रितीने शिंदे कुटूंबाला गव्हासाठी वर्षाकाठी ७५०० रुपये खर्चावे लागतात. आठवड्यातून किमान दोन वेळा खिचडी, भात किंवा तांदळाचे इतर पदार्थ केले जातात. त्यांना वर्षाकाठी किमान एक ते दीड क्विंटल तांदूळ लागतोच. हा खर्चही तीन ते साडेतीन हजाराच्या आसपास जातो. खुल्या बाजारातून धान्य खरेदीसाठी शिंदे कुटूंबाला वर्षाकाठी किमान १२,००० रुपये खर्च येतो.

अन्नसुरक्षा योजनेत गहू रुपये आणि तांदूळ रुपये किलो भावाने मिळतो. त्यामुळे शिंदे कुटुंबाला आता अन्नधान्य खरेदीसाठी वर्षाकाठी १२ हजारांऐवजी केवळ १,०५० रुपये खर्च येणार आहे. परिणामी या योजनेमुळे शिंदे कुटूंबियांचे वर्षाकाठी १०,९५० रुपये वाचणार असून अन्नधान्य खरेदीवरील वार्षिक ९१.२५ टक्के बचतही होणार आहे.

गव्हाच्या तुलनेतज्वारीमध्ये आयर्न, फायबर यांचे प्रमाण अधिक आहे. अंग मेहनतीचे काम करणाऱ्यांसाठी ज्वारी योग्य आहार आहे.
-डॉ.प्राची देकाटे, आहारतज्ज्ञ
बातम्या आणखी आहेत...