औरंगाबाद - मराठवाड्यातल्या सर्वच धरणांतील पाणीसाठ्यात झपाट्याने घट होत आहे. दोन महिन्यांत ३१० दलघमी (१०.९४ टीएमसी) पाणीसाठा म्हणजे चार टक्क्यांपेक्षा आधिक घट झाली आहे. मराठवाड्यातल्या एकूण ८४४ प्रकल्पांची ७९८० दलघमी साठवण क्षमता असताना उपयुक्त पाणीसाठा केवळ २३८ दलघमी उपलब्ध आहे. मराठवाड्यात सध्या जवळपास २२०० पेक्षा आधिक गावांना तीन हजार टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे.
मोठ्या प्रकल्पांत केवळ टक्के पाणी : मराठवाड्यातीलमोठ्या प्रकल्पांतील पाणीसाठा झपाट्याने खालावत आहे. जायकवाडी, येलदरी, सिद्धेश्वर,माजलगांव, मांजरा, निम्न तेरणा, मानार आणि सिना कोळेगाव या मोठ्या प्रकल्पांत शून्य टक्केपेक्षाही कमी पाणीसाठा आहे. जायकवाडी धरणातून गेल्या महिन्यात १.४१ टीएमसी पाणी सोडण्यात आले होते. त्यानंतर गेवराईसाठी पाच दलघमी, हिरडपुरी तसेच जालनामधल्या बंधाऱ्यासाठीदेखील पाणी सोडण्यात आले. ऊर्ध्व पैनगंगामध्ये १०० दलघमी उपयुक्त पाणीसाठा आहे. विष्णुुपुरीमध्ये टक्के, तर दुधनामध्ये १८ टक्के इतका पाणीसाठा आहे. मराठवाड्यात पंधरा जानेवारीला सर्व ८४१ प्रकल्पांत ७३४ दलघमी (९ टक्के) इतका पाणीसाठा होता, तर पंधरा फेब्रुवारीला ८४१ प्रकल्पांत ५४८ दलघमी (७) इतका पाणीसाठा होता. जानेवारी ते फेब्रुवारी या महिनाभरात १८६ दलघमी पाणीसाठा कमी झाला होता. १५ फेब्रुवारी ते १५ एप्रिलपर्यंत ३१० (१०.९४ टीएमसी) पाणीसाठा कमी झाला आहे. १५ फेब्रुवारीत जायकवाडीत टक्के पाणीसाठा होता.