आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

..तरीही 1150 मुली गणवेशापासून वंचित राहणार

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वैजापूर- सर्वशिक्षा अभियानांतर्गत नगरपालिकेच्या १९ शाळांमधील १ हजार १५० मुलींसाठी शिक्षण विभागाने २०० रुपये याप्रमाणे मुख्यध्यापकाच्या खात्यावर २ लाख ३० हजार रुपये जमा केले आहेत. मात्र विद्यार्थी व त्यांचे पालक याच्या संयुक्त बँक खात्यात गणवेश खरेदीचा  निधी वर्ग करण्याचे काम पूर्ण न झाल्यामुळे विद्यार्थ्यांना गणवेशा पासून वंचित राहावे लागणार आहे. याची दखल घेत माजी आमदार आर.एम. वाणी यांनी स्वखर्चातून देवीमंदिर शाळेतील सुमारे ६५ मुलांना गणवेश वाटप केले. लाजून का होईना पालिकेने गणवेशाचा लाभ मिळत नसलेल्या खुल्या प्रवर्गातील ४७२ विद्यार्थ्यांना पालिका फंडातून ९४ हजार ४०० रुपये याप्रमाणे गणवेश देण्याचे नियोजन केले आहे.    

प्रथम  बँकेत खाते उघडणे त्यानंतर गणवेश घेणे व त्याची पावती दाखवून दोन गणवेशांचे केवळ ४०० रुपये खात्यात जमा करणे अशा या योजनेमुळे जिल्ह्यातील बहुतांश शाळांमध्ये गोरगरीब मुले स्वातंत्र्यादिनी गणवेशापासून वंचित राहणार अशी चिन्हे असताना येथील देवीमंदिरातील  मुलांना माजी आमदार आर.एम. वाणी यांनी स्वखर्चातून गणवेश वाटप केले.  तसेच आधार नोंदणी नसल्यामुळे गणवेशासह इतर शैक्षणिक लाभापासून सदरील विद्यार्थी वंचित राहू नये यासाठी त्याचे आधार कार्ड नोंदणीही करून घेण्याचे काम त्यांनी करून घेतले.पालिकेच्या देवीमंदिर प्राथमिक शाळेत इयत्ता पहिली ते चौथीपर्यंतच्या वर्गात ६५ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत.   

मुले गणवेशात दिसली नव्हती
गेल्या आठवड्यात माजी आमदार वाणी याच्या हस्ते गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटपाचा कार्यक्रम पार पडला होता. तेव्हा बहुतांश विद्यार्थ्यांना  गणवेश नसल्याची बाब दिसून आली. शिक्षकाकडून त्यांनी याविषयी अधिक माहिती घेतल्यानंतर गरीब पालकांना बँकेत खाते उघडण्याची अडचण असल्याचे लक्षात आले होते. 
बातम्या आणखी आहेत...