आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • 116 Spots Dangerous For Lover Couples In Aurangabad

प्रेमी जोडप्यांसाठी औरंगाबादेतील ११६ ठिकाणे धोकादायक!

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - तिसगावशिवार आणि सुंदरवाडी येथे नुकत्याच झालेल्या मुलींवरील अत्याचार प्रकरणाची पुनरावृत्ती टाळण्यासाठी पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांनी नवी योजना जाहीर केली आहे. त्यानुसार प्रेमी जोडप्यांसाठी औरंगाबाद शहर आणि परिसरातील ११६ ठिकाणे धोकादायक असल्याचे घोषित करण्यात आले आहे. त्यातील काही ठिकाणे पोलिसांनी जाहीरही केली आहेत. या ठिकाणांवर दामिनी पथक, पेट्रोलिंग व्हॅनची २४ तास गस्त राहणार आहे.
निर्जन स्थळी, एकांतात असलेल्या जोडप्यातील मुलीवर नराधमांनी अत्याचार केल्याच्या घटना सुंदरवाडी, तिसगाव येथे घडल्या. त्यामुळे एकच खळबळ उडाली असून असे प्रकार टाळण्यासाठी काय करता येईल, याबाबत अमितेशकुमार यांनी वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांशी तसेच पोलिस निरीक्षकांशी चर्चा केली. तेव्हा प्रत्येक निर्जन स्थळी पोलिस कायमस्वरूपी पहारा देऊ शकत नसले तरी तेथे गस्त घालणे शक्य आहे, असे अधिकाऱ्यांनी सुचवले. त्यावरून नराधमांचा उपद्रव, वावर असलेल्या ठिकाणांची यादी तयार करण्याचे निर्देश आयुक्तांनी दिले. तेथे गस्तीसाठी दोन शिफ्टमध्ये दामिनी पथक, दहा मोबाइल पेट्रोलिंग व्हॅनद्वारे गस्त घालण्याचा निर्णय घेतला आहे.

त्याची तातडीने अंमलबजावणी करत आयुक्तांनी बुधवारी सकाळी गस्ती पथकाच्या पीसीआर (पोलिस कंट्रोल मोबाईल रुम) व्हैनला हिरवी झेंडीही दाखवली.
पुढे वाचा... अमितेशकुमार यांनी सांगितले की